Home /News /crime /

तरुणानं मोठ्या भावाची केली हत्या; घरच्यांनीही दिली साथ, एका चुकीमुळे अंत्यसंस्कारावेळीच फुटलं बिंग

तरुणानं मोठ्या भावाची केली हत्या; घरच्यांनीही दिली साथ, एका चुकीमुळे अंत्यसंस्कारावेळीच फुटलं बिंग

एक भाऊ आपल्याच भावाची हत्या करतो (Man Killed Elder Brother) आणि विशेष बाब म्हणजे संपूर्ण कुटुंब आरोपी भावाची साथ देतं आणि या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतं.

    नवी दिल्ली 02 जुलै: एक भाऊ आपल्याच भावाची हत्या करतो (Man Killed Elder Brother) आणि विशेष बाब म्हणजे संपूर्ण कुटुंब आरोपी भावाची साथ देतं आणि या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतं. मात्र, अंत्यसंस्कार करणाऱ्या पुजाऱ्यामुळे ही संपूर्ण घटना उघडकीस येते. हैराण करणारी ही घटना दिल्लीच्या (Murder in Delhi) करावल नगर परिसरातील आहे. हत्येचं एक असं प्रकरण इथून समोर आलं आहे, जे हैराण करणार आहे. यात एका व्यक्तीनं आपल्या मोठ्या भावाची हत्या केली. हत्येनंतर कुटुंबीयांनीही ही संपूर्ण घटना लपवण्याचा प्रयत्न केला. हे कुटुंब मृतदेह घेऊन स्मशान घाटावर पोहोचलं. मात्र, तिथे असलेल्या पुजाऱ्याला मृताच्या शरीरावर वार दिसल्यानं त्याला संशय आला. यानंतर त्यानं पोलिसांनी फोन करून बोलावून घेतलं. यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी (Postmortem) पाठवला, याचा रिपोर्ट समोर आल्यावर नात्याचाच गळा घोटणारं सत्य समोर आलं. बापरे बाप, या दोघांकडे सापडले साडेपाच कोटींचे ड्रग्ज, पोलिसही झाले अवाक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करावल नगरमध्ये राहाणारे रमेश चंद दिल्लीत होम गार्ड आहे. त्यांची दोन मुलं आहेत. मोठ्या मुलाचं नाव प्रेम शंकर आणि लहान मुलाचं नाव प्रशांत आहे. रमेश चंद यांचा मोठा मुलगा प्रेम शंकर याचं यंदाचं मे महिन्यात लग्न झालं होतं. प्रेम यांचा लहान भाऊ प्रशांत त्यांच्या मेव्हुणीसोबत सतत फोनवर बोलत असे तसंच चॅटही करत असे. हीच गोष्ट मोठा भाऊ प्रेम शंकर याला माहिती झाली. प्रेम शंकर या गोष्टीमुळे आपल्या लहान भावावर नाराज होते. ते वारंवार प्रशांतला आपल्या मेव्हुणीसोबत न बोलण्याचा सल्ला देत होते. मात्र, प्रशांत त्यांचं ऐकत नव्हता. भाजप आमदाराला जुगार खेळताना रंगेहाथ पकडलं; 25 जणांना अटक, 7 तरुणींचा समावेश २६ जून रोजी प्रशांत फोनवर बोलत होता. इतक्यात प्रेम शंकरनं त्याला फोनवर बोलताना पाहिलं आणि त्याच्या कानशिलात लगावली. याच गोष्टीमुळे नाराज असलेल्या प्रशांतनं आपल्या मोठ्या भावावर गोळी झाडली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही गोष्ट कुटुंबीयांनाही माहिती होती, मात्र हैराण करणारी बाब म्हणजे मोठ्या मुलाची हत्या होऊनही घरच्यांनी ही गोष्ट लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर घरातून हत्येचे सगळे पुरावेही नष्ट केले. नातेवाईकांना असं सांगण्यात आलं, की प्रेम शंकरचा मृत्यू घरात घसरुन पडल्यानं झाला. नातेवाईकांनीही या गोष्टीवर विश्वास ठेवला. मात्र, स्मशानभूमीतील पुजाऱ्याला फसवण्यात ते अपयशी ठरले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २७ जून रोजी प्रेम शंकरचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला. मात्र, अंत्यसंस्काराच्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या पुजाऱ्याला संशय आला आणि त्यानं पोलिसांनी फोन करुन बोलावून घेतलं. यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली असता ही घटना समोर आली. पोलिसांनी याप्रकरणी प्रशांतला अटक केली आहे. पोलिसांचं असं म्हणणं आहे, की पुजाऱ्याच्या सतर्कतेमुळे आरोपीला पकडण्यात यश आलं. अन्यथा कुटुंबीय अंत्यसंस्कार करून सर्व पुरावे नष्ट करण्यात यशस्वी ठरले असते.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Brother murder, Crime, Crime news, Delhi, Murder, Murder news, Postmortem

    पुढील बातम्या