• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • बापरे बाप, या दोघांकडे सापडले साडेपाच कोटींचे ड्रग्ज, पोलिसही झाले अवाक

बापरे बाप, या दोघांकडे सापडले साडेपाच कोटींचे ड्रग्ज, पोलिसही झाले अवाक

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं बुधवारी केलेल्या कारवाईचे तपशील जाहीर केले आहेत. या कारवाईत तब्बल साडेपाच कोटींपेक्षा अधिक किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

  • Share this:
मुंबई, 22 जून : मुंबईत अंमली पदार्थांचा सुळसुळाट झाल्याचं चित्र दिसू लागलं आहे. मुंबईमध्ये अंमली पदार्थांविरोधात एकाच महिन्यात तिसरी कारवाई झाली आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अंमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबईत  (Mumbai) बुधवारी केलेल्या कारवाईचे तपशील जाहीर केले आहेत. या कारवाईत मुंबई पोलिसांनी अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. यापूर्वीच्या कारवाईतदेखील मुंबई पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले (Crores of Rupees drugs seized) असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी दिली होती. पोलिसांनी या कारवाईत 1 किलो 250 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केलंय, ज्याची बाजारातील किंमत ही 2 कोटी 50 लाख एवढी आहे. याशिवाय 3 कोटी 24 लाख रुपये किंमतीचं 1 किलो 80 ग्रॅम हेरॉईन आणि ब्राऊन शुगरही जप्त करण्यात आलंय. याशिवाय 65 हजार रुपयांची रोकडही पोलिसांनी जप्त केलीय. या सगळ्याची एकूण किंमत 5 कोटी 74 लाख 65 हजार एवढी असल्याचं पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. या प्रकरणी संजीब निर्मय सरकार (वय 39) आणि सलीम अकबर खान (वय 41) या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर अंमली पदार्थ बाळगण्याबाबतच्या विविध कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथकानं 30 जूनला गोरेगावमधून आरोपींकडून हा माल हस्तगत करून त्यांना अटक केली होती. हे वाचा -घराबाहेर पडू न शकणाऱ्यांना आता मिळणार घरपोच लस, या जिल्ह्यात सुरुवात मुंबईत वाढल्या कारवाया गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत अंमली पदार्थ सापडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातही दादरमध्ये अंमली पदार्थ बाळगल्याप्रकऱणी कारवाई करण्यात आली होती. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात अंमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं दिसून आलं आहे. पब आणि बार बंद असल्यामुळे अनेकजण आपापल्या घरात ड्रग्ज पार्ट्या करत असल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुंबईत अशा प्रकारे कोट्यवधींचे रुपयांचे अंमली पदार्थ येतात कसे, हादेखील प्रश्न विचारला जात आहे. गुन्हेगारी टोळ्या पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचीदेखील ही लक्षणं मानली जात असल्याचं सांगितलं जात आहे.
Published by:desk news
First published: