जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / क्रूरतेचा कळस! वहिनीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी बापाने स्वतःच्या मुलीचा चिरला गळा

क्रूरतेचा कळस! वहिनीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी बापाने स्वतःच्या मुलीचा चिरला गळा

बापानेच घेतला मुलीचा जीव (प्रतिकात्मक फोटो)

बापानेच घेतला मुलीचा जीव (प्रतिकात्मक फोटो)

वहिनीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी आपल्याच मुलीचा गळा चिरला असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी घरात कुत्र्याचं रक्तही शिंपडलं.

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

लखनऊ 09 जुलै : उत्तर प्रदेशातील हरदोई येथील एका मुलीच्या हत्येचं प्रकरण अखेर पोलिसांनी उकललं आहे. यात एका व्यक्तीने आपला भाऊ आणि वहिनीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी आपल्याच मुलीचा गळा चिरला असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. यानंतर आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी घरात कुत्र्याचं रक्तही शिंपडलं. एवढंच नाही तर त्याने आपल्या मुलीच्या हत्येचा आरोप गावात राहणाऱ्या 4 लोकांवर केला. पोलिसांनी सांगितलं की, आम्ही प्रत्येक अँगलने प्रकरणाचा तपास केला आणि सर्व लोकांची चौकशी केल्यानंतर संशयाची सुई मृत मुलीच्या वडिलांकडे गेली. तो आपली विधानं वारंवार बदलत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हरदोईच्या पचदेवरा पोलीस स्टेशन परिसरात ही भयानक घटना घडली. बिसौली गावात राहणाऱ्या अनंगपालने आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितलं की, सुरुवातीला आरोपीनी आमच्या टीमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर त्याची कडक चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा मान्य केला. शेतीचा वाद, मोठ्या भावासोबत मधल्या भावाने केलं धक्कदायक कांड, गुप्तांग दाबलं अन्…., हादरवणारी घटना त्याच्या मुलीचे गावातीलच एका मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचं आरोपीनं चौकशीत पोलिसांना सांगितलं. ती अनेकदा प्रियकराशी फोनवर बोलायची. यासाठी त्याने आपल्या मुलीला अनेकदा मनाईही केली होती, पण तिने ऐकलं नाही. याच कारणामुळे तो मुलीवर संतापला होता. आरोपीने पुढे सांगितलं की, त्याच्या वहिनीचेही गावातील एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. ही गोष्ट त्याने आपल्या भावाला सांगितली. मात्र त्याचं ऐकण्याऐवजी भाऊ आणि वहिनीने त्याला बेदम मारहाण केली. यानंतर गेट बसवण्यावरून त्याचा भाऊ आणि वहिनीसोबत वाद झाला. त्यानंतर त्याने आपल्या भावजयीला अडकवण्याचा कट रचला आणि आपल्याच मुलीची हत्या केली. यासाठी त्याने भाऊ आणि वहिनीला जबाबदार धरलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात