जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शेतीचा वाद, मोठ्या भावासोबत मधल्या भावाने केलं धक्कदायक कांड, गुप्तांग दाबलं अन्...., हादरवणारी घटना

शेतीचा वाद, मोठ्या भावासोबत मधल्या भावाने केलं धक्कदायक कांड, गुप्तांग दाबलं अन्...., हादरवणारी घटना

आरोपींना अटक

आरोपींना अटक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे.

  • -MIN READ Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
  • Last Updated :

अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 9 जुलै : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून खून, आत्महत्या, तसेच बलात्काराच्याही घटना घडत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतीच्या वादातून मोठ्या भावाचा मधल्या भावाकडून खून करण्यात आला. गुप्तांग दाबल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी येथे ही धक्कादायक घटना घडली. बाबुराव गहेनाजी साखळे, असे मृत झालेल्या मोठ्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी धाकट्या भावाच्या तक्रारी वरून मध्यला भावासह चौघांविरुध्द अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी भावासह दोघे पुतण्यांना अटक करण्यात आली आहे. तीन दिवसापूर्वी जमिनीच्या वादातून मधल्या भावाने मोठ्या भावासोबत वाद करत त्याचे गुप्तांग दाबले. सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी येथे ही घटना घडली होती. या हादरवणाऱ्या घटनेनंतर आज उपचारादरम्यान मोठ्या भावाचा मृत्यू झाला आहे. मृताच्या लहान भावाने दिलेल्या फिर्यादीवरुन मधला भाऊ, त्याची पत्नी आणि दोन मुलावर अजिंठा पोलीस ठाण्यात खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. बुधवारी बुधवारी दोघा भावांचे शेतीच्या प्रकरणावरून वाद झाले. या वादात भगवान याने मृत बाबुराव याचे गुप्तांग दाबून उचलून पटकले. यात आरोपीचे मुले विशाल, आकाश आणि पत्नी सुभाद्राबाईने मृताच्या पोटात आणि अंगावर लाथा बुक्याने मारहाण केली. यानंतर बेशुद्ध अवस्थेत बाबुराव याला त्याच्या धाकटा भाऊ राजाराम साखळे याने उपचारासाठी संभाजी नगरातील घाटी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसर हादरला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात