मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

सासऱ्यानं सुनेसह 5 जणांची केली निर्घृण हत्या; स्वतःच पोलिसांकडे जात सांगितलं धक्कादायक कारण

सासऱ्यानं सुनेसह 5 जणांची केली निर्घृण हत्या; स्वतःच पोलिसांकडे जात सांगितलं धक्कादायक कारण

मृतांमध्ये 2 महिला, 2 लहान मुलं आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या हत्येच्या (Murder) घटनेनंतर आरोपीनं स्वतः पोलीस ठाण्यात जात याबाबतची माहिती दिली आणि सरेंडर केलं.

  • Published by:  Kiran Pharate

गुरुग्राम 24 ऑगस्ट : एक अत्यंत हृदयद्रावक आणि हादरवणारी घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेत एका व्यक्तीनं अवैध संबंधांच्या संशयातून पाच जणांची निर्घृण हत्या (Murder News) केली आहे. मृतांमध्ये 2 महिला, 2 लहान मुलं आणि एका पुरुषाचा समावेश आहे. ही धक्कादायक घटना हरियाणाच्या गुरुग्राममधून (Gurugram Murder Case) समोर आली आहे. घटना जिल्ह्यातील राजेंद्र पार्क येथील आहे. हत्येच्या या धक्कादायक घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे.

दहशतवाद्याला फोटो काढण्याचा होता 'शौक'; शेवटी त्याचाच फोटो भिंतीवर टांगला

या घटनेत घराच्या मालकानं आपल्या सुनेची, भाडेकरूची, भाडेकरूच्या पत्नीची आणि त्याच्या दोन मुलांची हत्या केली आहे. या हत्येच्या घटनेनंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलीस ठाण्यात जात आरोपीनं याबाबतची माहिती दिली आणि सरेंडर केलं. सकाळी सकाळीच पोलीस ठाण्यात जात आरोपीनं या घटनेची माहिती देत आपला गुन्हा मान्य केला. आरोपीला आपल्या सुनेचे भाडेकरूसोबत अवैध संबंध असल्याचा संशय होता. याच कारणामुळे रागात त्यानं हे धक्कादायक पाऊल उचललं आणि पाच जणांची निर्घृणपणे हत्या केली.

बहिणीच्या अंगावरील जखमा पाहून भावाचा संताप; मेव्हण्याला मरेपर्यंत मारत राहिला

या प्रकरणी पोलिसांनी सध्या आरोपीला अटक केली आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हा आरोपी सेवानिवृत्त सैनिक असल्याचं म्हटलं जात आहे. पाचही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेतंर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सापाने दंश केल्यानंतर भाऊ-बहीण ओरडले; आई मात्र कुशीत घेऊन दोघांनाही झोपवत राहिली

First published:

Tags: Crime news, Gang murder, Murder news