मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /सापाने दंश केल्यानंतर भाऊ-बहीण ओरडले; आई मात्र कुशीत घेऊन दोघांनाही झोपवत राहिली

सापाने दंश केल्यानंतर भाऊ-बहीण ओरडले; आई मात्र कुशीत घेऊन दोघांनाही झोपवत राहिली

आई म्हणते, मला कुठं माहित होतं की, मी माझ्या मुलांना कायमचं झोपवतं आहे.

आई म्हणते, मला कुठं माहित होतं की, मी माझ्या मुलांना कायमचं झोपवतं आहे.

आई म्हणते, मला कुठं माहित होतं की, मी माझ्या मुलांना कायमचं झोपवतं आहे.

मध्य प्रदेश, 23 ऑगस्ट : मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात आपल्या आईच्या कुशीत झोपणाऱ्या भाऊ-बहिणीला सापाचे दंश केल्यामुळे मृत्यू झाल्याचा भयावह प्रकार समोर आला आहे. दोघे रात्री झोपलेले असताना सापाने त्यांना दंश केला. त्यानंतर ते दोघे ओरडू लागले. आईला वाटलं ते दोघे घाबरले असतील म्हणून आईने दोघांना स्वत:जवळ कुशीत झोपवले. काही वेळानंतर दोघांच्या तोंडातून फेस आल्यानंतर काहीतरी अघटित घडल्याचा आईला संशय आला. (brothers and sister were bitten by snakes while sleeping on the terrace)

कुटुंबातील सदस्यांनी तातडीने मुलांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी निघाले. मात्र रुग्णालयात जाण्यापूर्वीच मुलीने जीव सोडला. त्यानंतर काही वेळानंतर बहिणीचाही मृत्यू झाला. आता आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मला काय माहित होतं की, मी माझ्या मुलांना कायमच झोपवतं आहे.

गच्चीवर झोपलं होतं कुटुंब

सोन्हर गावात राहणारे कमद सिंह बघेल, पत्नी ललिता आपली 7 वर्षांची मुलगी पिंकी आणि 4 वर्षांचा मुलगा संजयसह रविवारी रात्री घरातील गच्चीवर झोपले होते. रात्री साधारण 2 वाजता पिंकी आणि संजय यांना विषारी सापाने दंश केला. सापाने दंश केल्यानंतर पिंकी जोरात ओरडली आणि आईला दुखत असल्याचं सांगितलं. यानंतर मुलगाही झोपेतून जागा झाला. आणि रडू लागला. आई ललिताला वाटलं मुलं घाबरून रडत असतील, म्हणून त्यांनी दोन्ही मुलांना कुशीत घेतलं व त्यांना झोपवू लागली.

हे ही वाचा-भाजीत कोथिंबीर घातली नाही म्हणून पतीकडून मारहाण; पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल

डॉक्टर म्हणाले मुलांना वाचवायचं असेल तर मोठ्या रुग्णालयात जा

मुलांचे काका भगवान सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी सांगितलं की, मुलांना वाचविण्यासाठी तातडीने शिवपुरीला घेऊन जा. शिवपुरीच्या डॉक्टरांनी मुलांना तपासलं. तेव्हापर्यंत संजय याचा मृत्यू झाला होता. पिंकीला ग्वाल्हेर येथे हलविण्यात आलं. मात्र येथे जाऊन पिंकीची हत्या झाली. पिंकीच्या पायावर सापाने दंश केला आहे. याचे व्रणही दिसून आले आहेत. दोन्ही मुलांच्या मृत्यूनंतर ललिताची तब्येत बिघडली आहे.

First published:
top videos

    Tags: Madhya pradesh, Snake