मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /प्रियकरानं प्रेयसी समोरच केली तिच्या आईची हत्या; मृतदेह सुटकेसमध्ये भरून टॅक्सीत टाकताना फुटलं कपलचं बिंग

प्रियकरानं प्रेयसी समोरच केली तिच्या आईची हत्या; मृतदेह सुटकेसमध्ये भरून टॅक्सीत टाकताना फुटलं कपलचं बिंग

एपीएमसी परिसरातील गटारामध्ये एक पिशवी आढळून आली होती. या पिशवीतून दुर्गंधी येत होती.

एपीएमसी परिसरातील गटारामध्ये एक पिशवी आढळून आली होती. या पिशवीतून दुर्गंधी येत होती.

एका युवतीनं आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्या आईची हत्या केली (Man Killed Girlfriend's Mom) आणि यानंतर आईचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून टॅक्सीमध्ये टाकत ते दोघंही फरार झाले.

नवी दिल्ली 24 ऑगस्ट : हृदय पिळवटून टाकणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेत एका युवतीनं आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्या आईची हत्या केली (Man Killed Girlfriend's Mom) आणि यानंतर आईचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून टॅक्सीमध्ये टाकत ते दोघंही फरार झाले. या प्रकरणी संबंधित युवतीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) झाली आहे. सध्या दोघंही तुरुंगात आहेत. ही घटना इंडोनेशियामधील (Indonesia) आहे.

इंडोनेशियामधील हीथर मॅक नावाची युवती टॉमी शेफरवर प्रेम करत होती. दोघंही अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. याचदरम्यान युवती हीथर मॅक गर्भवती (Pregnant) राहिली. ही गोष्ट तिच्या आईला माहिती झाली. यानंतर आईला प्रचंड राग आला आणि तिनं मुलीला घरातून बाहेर काढण्याची धमकी दिली. आईची नाराजी पाहून हिथरही चिंतेत होती. यानंतर तिनं आपला प्रियकर (Lover) टॉमी शेफरसोबत मिळून 2015 मध्ये 62 वर्षीय शीला वॉन मॅक यांची हत्या करण्याचा प्लॅन केला.

सासऱ्यानं सुनेसह 5 जणांची केली निर्घृण हत्या; स्वतः पोलिसांकडे जात सांगितलं कारण

मिळालेल्या वृत्तानुसार, हीथर आणि शेफर यांचं शीला वॉनसोबत बालीच्या एका हॉटेलमध्ये भांडण झालं. यानंतर शेफरनं हीथरची आई शीला वॉनच्या डोक्यावर धारदार शस्त्रानं वार केला. यातच तिच्या आईचा मृत्यू झाला. इतकंच नाही तर हत्येनंतर महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून जंगलात फेकण्याचा प्लॅनही त्यांनी केला. मात्र, टॅक्सीमध्ये मृतदेह घेऊन जात असतानाच ते पकडले गेले. या प्रकरणात हीथरला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तर तिचा बॉयफ्रेंड टॉमीला 18 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, हीथरची चांगली वागणूक बघता तिला बालीच्या जेलमधून लवकरच सोडण्यात येणारे.

महिलेचं अपहरण करत 14 जणांनी केला बलात्कार; पोलीस दिसताच नग्नावस्थेतच पळाले आरोपी

शेफरनं कोर्टात हत्येची कबुली दिली आहे. मात्र, त्यानं असा दावा केला, की शीला वॉन यांच्यासोबत सुरू असलेल्या वादात तो स्वतःचा बचाव करत होता. शेफरनं सांगितलं, वॉन या गोष्टीमुळे नाराज होत्या की त्यांची मुलगी गर्भवती होती. कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान हीथरच्या वकिलांनी सांगितलं, की शील वॉन यांच्यावर हल्ला झाला तेव्हा हीथर बाथरूममध्ये लपली होती. मात्र, हत्येनंतर तिनं मृतदेह सुटकेसमध्ये भरण्यात मदत केली. ऑक्टोबर 2021 मध्ये तिची मुक्तता कऱण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Murder news