मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /धक्कादायक! महिलेचं अपहरण करून 14 जणांनी केला बलात्कार; पोलीस समोर दिसताच नग्नावस्थेतच पळाले आरोपी

धक्कादायक! महिलेचं अपहरण करून 14 जणांनी केला बलात्कार; पोलीस समोर दिसताच नग्नावस्थेतच पळाले आरोपी

सुरुवातीला 2 आरोपींनी महिलेवर बलात्कार केला. काही वेळानंतर 5 बाईकवर बसून आणखी १२ जण याठिकाणी आले. या सर्वांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला

सुरुवातीला 2 आरोपींनी महिलेवर बलात्कार केला. काही वेळानंतर 5 बाईकवर बसून आणखी १२ जण याठिकाणी आले. या सर्वांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला

सुरुवातीला 2 आरोपींनी महिलेवर बलात्कार केला. काही वेळानंतर 5 बाईकवर बसून आणखी १२ जण याठिकाणी आले. या सर्वांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला

पाटणा 24 ऑगस्ट : एका 32 वर्षीय महिलेवर 14 जणांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या नराधमांनी आधी महिलेचं अपहरण केलं आणि यानंतर तिला नदीच्या किनाऱ्यावर घेऊन गेले. इथे आरोपींनी सर्व हद्दी पार करत महिलेवर सामूहिक बलात्कार केला. घटनेची माहिती मिळताच जेव्हा पोलीस (Police) घटनास्थळी पोहचले तेव्हा आरोपींनी आपले कपडे तिथेच सोडले आणि नग्नावस्थेतच ते पळत सुटले. आरोपींनी आपल्या चपलाही तिथेच सोडल्या. ही घटना बिहारच्या (Bihar Crime) गया (Gang Rape in Gaya) येथील आहे.

पीडित महिलेची अवस्था सध्या गंभीर आहे. महिलेला गयाच्या मगध मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना फस्सिल ठाण्याच्या क्षेत्रातील आहे. असं सांगितलं जात आहे, की दोन युवक महिलेला उचलून आपल्या गाडीवरून फल्गु नदीवर घेऊन गेले. याचठिकाणी आरोपींनी महिलेवर बलात्कार केला. काही वेळानंतर 5 बाईकवर बसून आणखी १२ जण याठिकाणी आले. या सर्वांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. जेव्हा पीडितेनं याचा विरोध केला तेव्हा आरोपींनी तिला जबर मारहाण केली.

दहशतवाद्याला फोटो काढण्याचा होता 'शौक'; शेवटी त्याचाच फोटो भिंतीवर टांगला

मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला जेव्हा दोन युवक महिलेला घेऊन नदीच्या काठावर आले तेव्हा आसपासच्या गावातील लोकांनी त्यांना पाहिलं. मात्र, अंधार असल्यानं कोणाला काहीच समजलं नाही. काही वेळानंतर जेव्हा गाड्यांवर १२ जण नदीकडे जाताना दिसले तेव्हा गावातील लोकांना शंका आली. यानंतर गावातील काही लोकांनी नदीच्या कडेला जाऊन पाहिल्यानंतर त्यांना या घटनेबद्दल समजलं. यानंतर गावातील लोकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना काहीच समजलं नाही, नंतर त्यांची नजर बाईकवर गेली आणि यानंतर नदीत उड्या घेत पोलीस मध्यभागी असलेल्या बेटावर पोहोचले.

सापाने दंश केल्यानंतर भाऊ-बहीण ओरडले; आई मात्र कुशीत घेऊन दोघांनाही झोपवत राहिली

पोलिसांना येताना पाहून आरोपी कपडे न घालताच नग्नावस्थेत पळत सुटले. पोलिसांनी आरोपींचे कपडे आणि चपला ताब्यात घेतल्या आहेत. तर, महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या महिलेची अवस्था गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Gang Rape