Home /News /news /

एकतर्फी प्रेमातून नात्यातील तरुणीचा छळ; भररस्त्यात पीडितेला अडवून केलं विकृत कृत्य

एकतर्फी प्रेमातून नात्यातील तरुणीचा छळ; भररस्त्यात पीडितेला अडवून केलं विकृत कृत्य

गोंदियातील एका डॉक्टरनं आपल्या पेशाला काळिमा फासला आहे.

गोंदियातील एका डॉक्टरनं आपल्या पेशाला काळिमा फासला आहे.

Crime in Aurangabad: पीडित तरुणीनं लग्नासाठी नकार (Victim refused to marry) दिल्याच्या रागात आरोपीनं पीडितेला भररस्त्यात अडवून तिच्याशी विकृत कृत्य केलं आहे.

    औरंगाबाद, 26 ऑगस्ट: ठाण्यातील एका तरुणानं एकतर्फी प्रेमातून (Crime in one sided love) आपल्याचं नात्यातील एका तरुणीचा छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणीनं लग्नासाठी नकार (Victim refused to marry) दिल्याच्या रागात आरोपीनं पीडितेला भररस्त्यात अडवून तिच्याशी विकृत कृत्य केलं आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं पोलिसांत तक्रार केल्यास अॅसिड फेकण्याची (Threatening to throw acid) धमकीही दिली आहे. याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. प्रवीण प्रभू पैठणकर असं आरोपी तरुणाचं नाव असून तो ठाणे शहराच्या रामनगर परिसरातील वाघळे इस्टेट परिसरात वास्तव्याला आहे. मागील काही दिवसांपासून आरोपी प्रवीणनं पीडित तरुणीकडे लग्नासाठी तगादा लावला होता. पण पीडितेनं त्याला नकार दिला होता. पण आरोपीनं तिचा पिच्छा सोडला नाही. 'माझ्याशी लग्न कर, अन्यथा तुझं कोणाबरोबरही लग्न होऊ देणार नाही', अशी धमकी देत आरोपीनं नात्यातील तरुणीला भर रस्त्यात अडवून तिला शिवीगाळ करत जबरी मारहाण केली आहे. हेही वाचा- दोस्तीत कुस्ती करणाऱ्या मित्राचा खेळ खल्लास; नागपूरात तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या नेमकं काय घडलं? 9 ऑगस्ट रोजी पीडित तरुणी दुचाकीवरून आपल्या घरी जात होती. दरम्यान आरोपीनं तिला भर रस्त्यात अडवलं. तसेच लग्नासाठी तिच्याकडे तिच्याकडे विचारणा केली. पण यावेळीही तरुणीनं नकार दिला असता, आरोपीनं तिला शिवीगाळ करत मारहाण केली आहे. एवढंच नाही, याबाबत पोलिसांत तक्रार केली तर चेहऱ्यावर अॅसिड फेकण्याची धमकीही दिली. हेही वाचा-13 वर्षीय भावाला PORN VIDEO दाखवायची बहिण; पुढे जे घडलं त्यानं मुंबई हादरली या घटनेनंतर पीडित तरुणीनं भेदरलेल्या अवस्थेत जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी प्रवीण पैठणकर याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनंतर पुंडलिकनगर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad, Beating retreat, Crime news, Sexual harassment

    पुढील बातम्या