मालेगाव,01 फेब्रुवारी : चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीने पोलीस स्थानकाच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात घडली आहे. धक्कादायक म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच संशयित आरोपीच्या पत्नीचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनमध्ये ही घटना घडली आहे. गणेश जगताप असे आत्महत्या करणाऱ्याचे तरुणाचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी गणेशच्या पत्नीने आत्महत्या केली होती. या प्रकरणी गणेशला चौकशी करण्यासाठी पोलिसांनी बोलावले होते. पोलीस स्थानकात आल्यानंतर त्याने पोलीस स्टेशन आवारात असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
(अॅलेस डेथ, व्हॉट आय डू? हातावर लिहून 17 वर्षीय मुलाने कॉलेजच्या शौचालयात संपवलं आयुष्य)
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनला भेट देऊन चौकशी सुरू केली आहे. चौकशीनंतर स्पष्ट होईल की गणेशने आत्महत्या केली की पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
जालना नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याची गळफास घेवून आत्महत्या
दरम्यान, जालना नगरपरिषदेच्या एका कर्मचाऱ्यानं राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. अनंता भीमाशंकर लांडे असं आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचं नाव असून ते खरपुडी रोडवरील हरि गोविंद नगरमध्ये राहत होते. अनंता लांडे हे पालिकेत अकाऊंटचं काम सांभाळत होते. आज पहाटे त्यांनी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. दरम्यान याच माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनमा केला. मात्र आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.