राहुल पाटील, प्रतिनिधी
पालघर, 01 फेब्रुवारी : मुंबईजवळील पालघरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. ज्ञानमाता आदिवासी महाविद्यालयामध्ये एका विद्यार्थ्याने बाथरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पालघरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या तलासरीतील ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक आश्रम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झरी येथे एका विद्यार्थ्याने बाथरूम मध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. अॅलेस विनय लखन असं या 17 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे.
(पालघर : चारित्र्याचा संशय पत्नीसोबत पतीचं धक्कादायक कृत्य, चिमुकल्यांनी फोडला टाहो)
अॅलेस लखन हा तलासरी तालुक्यातील सावरोळी उधानपाडा येथील मूळचा रहिवासी होता. अँलेस हा अकरावीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. प्रेम प्रकरणाच्या नैराश्यातून त्याने ही आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
ॲलेसचा मृतदेह बाथरूममध्ये लटकलेला पाहताच वस्तीगृह व्यवस्थापन आणि वस्तीगृहातील कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र त्यावेळी त्याला डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आलं.
ॲलेस डेथ आणि व्हॉट आय डू? असं मृत अँलेसच्या हातावर लिहिलं असल्याची माहिती समोर आली आहे. तलासरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाच्या तपासणीला सुरुवात केली आहे. मात्र या सगळ्या घटनेमुळे आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
जालना नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याची गळफास घेवून आत्महत्या
दरम्यान, जालना नगरपरिषदेच्या एका कर्मचाऱ्यानं राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. अनंता भीमाशंकर लांडे असं आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचं नाव असून ते खरपुडी रोडवरील हरि गोविंद नगरमध्ये राहत होते. अनंता लांडे हे पालिकेत अकाऊंटचं काम सांभाळत होते. आज पहाटे त्यांनी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. दरम्यान याच माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनमा केला. मात्र आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे..
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.