नागपूर, 01 फेब्रुवारी : नागपूरमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. कौटुंबिक कलहातून एका विवाहित महिलेनं आपल्य तीन वर्षांचा चिमुकलीसह अंबाझरी तलावात उडी मारून आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. जेव्हा मायलेकींचे मृतदेह बाहेर काढले होते, तेव्हा चिमुकली आईच्या छातीला कवटाळलेला अवस्थेत होती. हे दृश्य पाहून उपस्थितींच्या डोळ्यात पाणी आलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या अंबाझरी तलावात एका 28 वर्षीय विवाहित महिलेने आपल्या 3 वर्षीय मुलीसोबत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. कल्पना पंडागळे असं विवाहित महिलेचं नाव आहे. तीन वर्षांचा मुलीसह तलावात उडी घेतली. एका प्रत्यक्षदर्शींने घटनेची माहिती दिली.
(वाढदिवसाच्या पार्टीनंतर पाय धुण्यासाठी गेला तो परतलाच नाही; हिंगणा येथील घटनेने खळबळ)
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही मृतदेह तलावाच्या बाहेर काढले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. कौटुंबिक कलहातून घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मृतदेह बाहेर काढल्यानंतर तीन वर्षाची चिमुकली आईच्या छातीला कवटाळलेला अवस्थेत होता, हे दृश्य बघून सर्वांचे डोळे पाणावले.
( 'ती' रात्री 2 वाजता स्टेशनवर आली; घरी जाण्यासाठी रिक्षा पकडला, पण वाटेत घडलं भयंकर!)
आत्महत्येपूर्वी कल्पनाने आपल्या पतीला एक संदेश पाठवला होती. 'तुला उद्या गूड न्यूज मिळेल, शेवटी एकदा मुलीचा चेहरा बघायचा असेल तर सांग' असा मेसेज तिने आपल्या पतीला केला होता. त्यानंतर ती सोमवारी रात्री ती मुलीला घेऊन अंबाझरी तलावावर आली. तलावावर आल्यानंतर काठावर बसून तिने लेकीला खाऊ घातलं. त्यानंतर मुलीला कडेवर घेऊन पाण्यात उडी घेतली. घटनास्थळी एक चिठ्ठी आढळून आली होती. यामध्ये आई, पती आणि भावाचा मोबाईल क्रमांक लिहून ठेवला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: नागपूर