मराठी बातम्या /बातम्या /Viral /

9 तास गाडी चालवत प्रियकराला भेटण्यासाठी गेली तरुणी; बॉयफ्रेंडला त्या अवस्थेत पाहून बसला धक्का

9 तास गाडी चालवत प्रियकराला भेटण्यासाठी गेली तरुणी; बॉयफ्रेंडला त्या अवस्थेत पाहून बसला धक्का

आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी ही तरुणी कारमधून गेली. ती पूर्ण ९ तास ड्रायव्हिंग केली. मात्र, यानंतर ती जेव्हा आपल्या प्रियकराला भेटली तेव्हा तिला धक्का बसला.

आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी ही तरुणी कारमधून गेली. ती पूर्ण ९ तास ड्रायव्हिंग केली. मात्र, यानंतर ती जेव्हा आपल्या प्रियकराला भेटली तेव्हा तिला धक्का बसला.

आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी ही तरुणी कारमधून गेली. ती पूर्ण ९ तास ड्रायव्हिंग केली. मात्र, यानंतर ती जेव्हा आपल्या प्रियकराला भेटली तेव्हा तिला धक्का बसला.

    नवी दिल्ली 22 ऑक्टोबर : प्रेम (Love) हे एक असं नातं आहे ज्यात विश्वास आणि प्रामाणिकपणा अत्यंत गरजेचा आहे. प्रेमात अनेक लोक एकमेकांसाठी जीव देण्यासही तयार असतात. मात्र, याच प्रेमात विश्वासघात झाल्यास नातं जास्त दिवस टिकत नाही. सोशल मीडियावर एका तरुणीनं आपल्यासोबत झालेल्या विश्वासघाताची (Boyfriend Cheated With Girl) घटना शेअर केली आहे. टिकटॉकवर (Tiktok) @yummyyamssss नावाच्या अकाऊंटवरुन तिनं आपली स्टोरी शेअर केली. लोकांचे टॉयलेट साफ करून 'ती' बनली लखपती; फक्त 3 दिवसांचा पगार वाचूनच चक्कर येईल ही तरुणी मागील एका वर्षापासून एक युवकासोबत रिलेशनशिपमध्ये (Relationship) होती. मात्र, दोघांचं नातं लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप (Long Distance Relationship) होतं. याच दरम्यान अचानक आपल्या बॉयफ्रेंडला सरप्राईज देण्याचा विचार या तरुणीनं केला. आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी ही तरुणी कारमधून गेली. ती पूर्ण ९ तास ड्रायव्हिंग केली. मात्र, यानंतर ती जेव्हा आपल्या प्रियकराला भेटली तेव्हा तिला धक्का बसला. या तरुणीचा प्रियकर एकसोबतच अनेक मुलींसोबत रोमान्स (Romance) करत होता. यातील एक तरुणी गरोदरही होती. तरुणीनं आपल्या टिकटॉक अकाऊंटवरुन ही घटना शेअर केली. तिनं सांगितलं, की लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये तिचा प्रियकर तिला एका वर्षापासून धोका देत होता. त्याचे अनेक महिलांसोबत संबंध होते. तरुणीनं सांगितलं की ती आपल्या प्रियकराला डेटिंग साईटवर भेटली होती. यानंतर दोघंही दर महिन्याला भेटू लागले. मात्र, यावेळी तरुणी प्रियकराला न सांगताच भेटण्यासाठी आली. यावेळी तिला आपल्या प्रियकराच्या घरी अनेक मुलींच्या वस्तू आढळल्या. तिनं विचारणा केली असता सुरुवातीला तिच्या प्रियकराने आधी अनेक खोट्या गोष्टी रचल्या. मात्र, अखेर त्यानं आपण धोका दिल्याचं मान्य केलं. Private part सोबत नको तो प्रयोग पडला महागात; असह्य वेदना झाल्या आणि शेवटी... सत्या समोर येताच तरुणीनं त्याच्यासोबतचं नातं तोडलं. आपल्या ब्रेकअपनंतर तिवं व्हिडिओ बनवून इतर मुलींनाही लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये सावध राहण्याचा सल्ला दिला. सत्य लवकरच समोर आलं, यासाठी तिनं आनंदही व्यक्त केला. ती आपल्या प्रियकरासोबत लग्न करण्याचाही विचार करत होती. मात्र, आता त्याचा चेहरा पाहण्याचीही तिला इच्छा नाही.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Love story, Relationship

    पुढील बातम्या