जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / 'माझी पत्नी परत मिळवून द्या' म्हणत तरुणाने ठाण्याबाहेर प्राशन केलं विष, पोलिसांवरच केले गंभीर आरोप

'माझी पत्नी परत मिळवून द्या' म्हणत तरुणाने ठाण्याबाहेर प्राशन केलं विष, पोलिसांवरच केले गंभीर आरोप

'माझी पत्नी परत मिळवून द्या' म्हणत तरुणाने ठाण्याबाहेर प्राशन केलं विष, पोलिसांवरच केले गंभीर आरोप

. जितेंद्र पत्नीला घेण्यासाठी सासरच्या घरी पोहोचला. मात्र पत्नीने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. त्याला घराबाहेरही हाकलून दिलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनऊ 12 जून : उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये विषारी द्रव्य प्राशन केल्यानंतर तरुणाने पोलीस चौकीत जाऊन गोंधळ घातला. काही वेळाने तो बेशुद्ध पडला आणि पोलिसांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. सध्या या तरुणाची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकरण मोहन रोड पोलीस ठाण्यातील आहे (Man Consumes Poison outside Police Station). मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्रचं त्याच्या पत्नीशी भांडण झालं, त्यानंतर पत्नी आपल्या माहेरी आली. पत्नीचं घर पारा येथील कनक सिटीमध्ये आहे. जितेंद्र पत्नीला घेण्यासाठी सासरच्या घरी पोहोचला. मात्र पत्नीने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. त्याला घराबाहेरही हाकलून दिलं. Buldhana: प्रेमसंबंधात पतीचा अडथळा; प्रियकर आणि मुलासोबत मिळून काढला पतीचा काटा, 12 तासांत पोलिसांनी हत्येचा लावला छडा अस्वस्थ झालेल्या जितेंद्रने पोलीस चौकी गाठून पोलिसांकडे मदतीचं आवाहन केलं. पोलिसांनी फोन करताच पत्नी आणि तिचे नातेवाईक तिथे आले. पोलिसांनी दोघांची समजूत काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र पत्नीला ते मान्य न झाल्याने तिने पुन्हा जितेंद्रसोबत जाण्यास नकार दिला. यानंतर पोलिसांनी जितेंद्रला घरी जाण्यास सांगितलं. मात्र काही वेळाने जितेंद्र पुन्हा पोलीस चौकीत आला आणि बाहेरच गोंधळ घालू लागला. जितेंद्र ओरडला आणि म्हणाला, “पोलीस माझ्या पत्नीला माझ्यासोबत पाठवत नाहीत. पोलिसांनी माझ्याकडे पैसे मागितले. जेव्हा मी पैसे दिले नाहीत, तेव्हा पोलिसांनी माझ्या तक्रारीवर कारवाई केली नाही.” जितेंद्र याने यादरम्यान अनेकदा सांगितलं की त्याने विष प्राशन केलं आहे. मात्र पोलिसांनी ते गांभीर्यानं घेतलं नाही. प्रेमासाठी पतीला सोडलं; कोर्टात लग्नही केलं, महिनाभरातच प्रियकराने केलं धक्कादायक काम़ काही वेळाने जितेंद्रच्या तोंडातून फेस येऊ लागल्याने पोलिसांनाही धक्का बसला. जितेंद्रने सल्फास प्राशन केल्याचं निष्पन्न झालं. त्याला तातडीने लखनऊ येथील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. सध्या जितेंद्रची प्रकृती ठीक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हे प्रकरण परस्पर वादाचं असल्याचं मोहन चौकी प्रभारी यांनी सांगितलं. जितेंद्र आपल्या पत्नीला मारहाण करतो आणि तिच्यावर संशय घेतो. याला कंटाळून पत्नी माहेरी आली. तिला परत आणण्यासाठी जितेंद्र सासरच्या घरी गेला पण पत्नीने त्याच्यासोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांनी सांगितलं की जितेंद्रने आपल्या पत्नीला यापूर्वीही अनेकदा मारहाण केली आहे. आता बायको त्याच्यासोबत जायला अजिबात तयार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात