जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / प्रेमासाठी पतीला सोडलं; कोर्टात लग्नही केलं, महिनाभरातच प्रियकराने केलं धक्कादायक काम

प्रेमासाठी पतीला सोडलं; कोर्टात लग्नही केलं, महिनाभरातच प्रियकराने केलं धक्कादायक काम

प्रेमासाठी पतीला सोडलं; कोर्टात लग्नही केलं, महिनाभरातच प्रियकराने केलं धक्कादायक काम

बेचन पासवान यांनी त्यांची मुलगी काजल हिचं लग्न दुसऱ्याशी लावलं. पण काजलला हे लग्न मान्य नव्हतं. तिने राजेशशी संपर्क ठेवला आणि लग्नानंतर काही दिवसांनी राजेशसोबत नवीन संसार थाटण्याच्या उद्देशाने ती सासरच्या घरातून पळून गेली

  • -MIN READ
  • Last Updated :

पाटणा 11 जून : एका तरुणीने आपल्या प्रियकरावर अगदी मनापासून प्रेम केलं. मात्र, प्रियकराकडून तिला हे प्रेम मिळालं नाही. तो अतिशय क्रूर निघाला. त्याने आपल्या प्रेयसीचं प्रेम, जिद्द, समर्पण या कशाचीही पर्वा केली नाही आणि लग्नानंतर महिनाभरातच तिची हत्या करून फरार झाला (Husband Killed Wife). काजल नावाच्या मुलीची ही दुःखद कहाणी वैशाली जिल्ह्यातील आहे. काजल बेलसर ही अफजलपूर गावात राहणारे बेचन पासवान यांची मुलगी होती. तिच्याच गावच्या राजेश साहनीवर तिचं खूप प्रेम होतं. पण दोघांच्या जाती वेगळ्या होत्या. त्यामुळेच हे नातं त्यांच्या घरच्यांना मान्य नव्हतं. त्यामुळे बेचन पासवान यांनी त्यांची मुलगी काजल हिचं लग्न दुसऱ्याशी लावलं. पण काजलला हे लग्न मान्य नव्हतं. तिने राजेशशी संपर्क ठेवला आणि लग्नानंतर काही दिवसांनी राजेशसोबत नवीन संसार थाटण्याच्या उद्देशाने ती सासरच्या घरातून पळून गेली. राजेशनेही तिला साथ दिली. 4 मे 2022 रोजी दोघांनी कोर्टात लग्न केलं. सप्तपदी झाल्या, एकमेकांना वचन दिलं; मात्र पाठवणीवेळी नवरीने सासरी जाण्यास दिला नकार लग्न झाल्यानंतर हे दोघंही घरापासून दूर राहत होते. लग्नानंतर महिनाभरानंतर राजेश जूनच्या पहिल्या आठवड्यात काजलला त्याच्या घरी घेऊन आला. मात्र घरच्यांनी काजलला स्विकारण्यास नकार दिला. बऱ्याच प्रयत्नांनंतर घरच्यांनीही त्यांना स्विकारलं. यानंतर हे आंतरजातीय जोडपं एकत्र राहू लागलं. काजल पती राजेशसोबत सासरच्या घरी परतली असताना तिचे वडील बेचन पासवान तिला भेटायला आले होते. मात्र आधीच चिडलेल्या सासरच्या मंडळींनी त्यांना बेदम मारहाण केली. प्रकरण पंचायतीपर्यंत पोहोचलं आणि निकाली काढण्यात आलं. मात्र एक-दोन दिवसांनी काजलची हत्या झाली. या घटनेनंतर सासरचे लोक तिथून पळून गेले. या हत्येची खबर शेजाऱ्यांकडून पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून तपास केला. दरम्यान, काजलचे वडील बेचन पासवानही पोहोचले होते. हातावर मेहंदी आणि मंडपात सजून-धजून बसलेली नवरी थेट पोलीस ठाण्यात पोहोचली; नेमकं काय घडलं? बेलसर ओपीचे एसएचओ सुनील कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सखोल तपास केल्यानंतर पोलिसांनी हत्येतील आरोपींच्या शोधात छापेमारी सुरू केली. या छाप्यात सासरचे ४ जण पोलिसांच्या हाती लागले असून, पती राजेश साहनी अद्याप फरार आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. राजेश साहनीच्या शोधात पोलीस सतत छापे टाकत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात