जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Buldhana: प्रेमसंबंधात पतीचा अडथळा; प्रियकर आणि मुलासोबत मिळून काढला पतीचा काटा, 12 तासांत पोलिसांनी हत्येचा लावला छडा

Buldhana: प्रेमसंबंधात पतीचा अडथळा; प्रियकर आणि मुलासोबत मिळून काढला पतीचा काटा, 12 तासांत पोलिसांनी हत्येचा लावला छडा

प्रेमसंबंधात पतीचा अडथळा; प्रियकर आणि मुलासोबत मिळून काढला काटा, 12 तासांत पोलिसांनी हत्येचा लावला छडा

प्रेमसंबंधात पतीचा अडथळा; प्रियकर आणि मुलासोबत मिळून काढला काटा, 12 तासांत पोलिसांनी हत्येचा लावला छडा

Buldhana Crime News: या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि अवघ्या 12 तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलढाणा, 12 जून : अनैतिक प्रेमसंबंधांत अडथळा ठरत असलेल्या पतीची पत्नीने हत्या (wife killed husband) केल्याची घटना उघडकीस आली आहे. पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. धक्कादायक म्हणजे ही हत्या करण्यात आरोपी पत्नीला तिच्याच अल्पवयीन मुलाने (minor child help mother in act) सुद्धा मदत केल्याची माहिती समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. (Wife killed husband with help of lover and minor son in Buldhana) नेमकं काय आहे प्रकरण? बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात येणार्‍या भुमराळा गावात प्रियकर आणि स्वतःच्या मुलाच्या साथीने एका महिलेने स्वतःच्या नवऱ्याची हत्या केली आहे. आरोपी महिलेने आपला अल्पवयीन मुलगा आणि प्रियकर ज्ञानदेव आघाव या दोघांच्या मदतीने पती रामदास सरकटे यांची हत्या केली. दोरीने गळा आवळून हत्या केल्याचं तपासात उघड झालं आहे. वाचा :  लग्न पत्रिका वाटताना काळाचा घाला; नवरदेवासह दोघांचा अपघातात मृत्यू पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न प्रियकर ज्ञानदेव आघाव यांच्या साहाह्याने पती रामदास सरकटे यांची दोरीने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पतीचा मृतदेह विहिरीत नेऊन टाकला. आरोपींनी फिल्मी स्टाइल हा संपूर्ण प्रकार करून पुरावा नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी केवळ बारा तासांच्या आत या संपूर्ण घटनेचा छडा लावला आहे. तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. भिवंडीत दारुड्याने पत्नीला जिवंत जाळलं दारुड्या पतीने कुटुंबिक वादातून पत्नीस बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नी बेशुद्ध पडली असता जळणासाठी साठविलेल्या लाकूड फाट्यात टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली आहे. कविता चौरसिया (वय 35 वर्षे) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव असून हत्या करणारा पती संतोष चौरसिया (वय 35 वर्षे) यास भिवंडी तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक करून बेड्या ठोकल्या आहेत. वाद विकोपाला गेल्याने संतोषने पत्नीस लाकडी दांड्याने मारहाण करीत तिचे डोके लोखंडी कपाटावर आदळले. यामध्ये कविता बेशुद्ध पडली. त्यानंतर पती संतोष याने घराबाहेर पडवीत पावसाळ्यात जळणासाठी साठवून ठेवलेल्या लाकडाच्या ढिगाऱ्या जवळ तिला फरफटत आणून लाकडांसह बेशुद्ध पत्नीस जाळून तिची हत्या केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात