मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

हृदयद्रावक! आईच्या मृत्यूनंतर हतबल मुलानंही उचललं टोकाचं पाऊल, समोर आलं धक्कादायक कारण

हृदयद्रावक! आईच्या मृत्यूनंतर हतबल मुलानंही उचललं टोकाचं पाऊल, समोर आलं धक्कादायक कारण

एक अत्यंत हृदयद्रावक प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. या घटनेत एका युवकानं शनिवारी आत्महत्या (Suicide Due to Financial Crisis) केली आहे. या आत्महत्येचं कारण अतिशय धक्कादायक आहे

एक अत्यंत हृदयद्रावक प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. या घटनेत एका युवकानं शनिवारी आत्महत्या (Suicide Due to Financial Crisis) केली आहे. या आत्महत्येचं कारण अतिशय धक्कादायक आहे

एक अत्यंत हृदयद्रावक प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. या घटनेत एका युवकानं शनिवारी आत्महत्या (Suicide Due to Financial Crisis) केली आहे. या आत्महत्येचं कारण अतिशय धक्कादायक आहे

  • Published by:  Kiran Pharate

रांची 27 जून: एक अत्यंत हृदयद्रावक प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. या घटनेत एका युवकानं शनिवारी आत्महत्या (Suicide Due to Financial Crisis) केली आहे. या आत्महत्येचं कारण अतिशय धक्कादायक आहे. आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्यानं त्यानं हे धक्कादायक पाऊल उचललं आहे. किशन चौधरी असं मृताचं नाव आहे. अर्धांगवायूमुळे मागील तीन वर्षांपासून किशनची आई आजारी होती. शुक्रवारी अचानक प्रकृती खालावल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. ही घटना झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील चरकीपहाडी गावातील आहे. (Man Commits Suicide After His Mother Dies)

कुटुंबातील इतर सर्व सदस्य एका लग्नसमारंभासाठी गावातून बाहेर गेले होते. त्यामुळे घरी जास्त लोक यावेळी उपस्थित नव्हते. घटनेची माहिती मिळताच घरातील इतर सदस्य संध्याकाळपर्यंत गावी पोहोचले. अंधार असल्यानं दुसऱ्या दिवशी सकाळी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कुटुंबातील सदस्यांनी घेतला. यादरम्यान महिलेच्या मृतदेहाच्या देखरेखीसाठी सर्व सदस्य एकाच ठिकाणी झोपले होते. मात्र, अचानक रात्री उशिरा लहान मुलगा किशन चौधरी खोलीमध्ये झोपण्यासाठी गेला आणि त्यानं दरवाजा आतून बंद केला. शनिवारी सकाळी कुटुंबातील सदस्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केलामात्र बराच आतमधून काहीच आवाज आला नाही त्यामुळे नातेवाईकांच्या मनात संशय आला. यानंतर खोलीत डोकावून पाहाण्याचा प्रयत्न केला गेला.

सोनं गहाण ठेवून घेतलं पीककर्ज; हफ्ते फेडता न आल्यानं शेतकऱ्यानं मृत्यूला कवठाळलं

यानंतर लोकांची नजर छताला लावण्यात आलेल्या लाकडाला बांधलेल्या दोरीला लटकलेल्या किशनच्या मृतदेहावर पडली. कुटुंबीयांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर घटनेची माहिती घेऊन आई आणि मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत असं समोर आलं, की मृत तरुण रोजंदारी करत असे. मात्र, लॉकडाऊनमुळे त्याला हे कामही दररोज मिळत नसल्यानं कुटुंब चालवणंही कठीण झालं होतं. तो आपल्या आईला मिळालेल्या वृद्धा पेन्शन आणि राशनर अवलंबून होता. आईच्या मृत्यूनंतर त्याच्याकडे अंत्यसंस्कारासाठीही पैसे नव्हते.

राम मंदिर जमीन घोटाळा हा सुद्धा ईडीच्या तपासाचा विषय पण.., राऊतांचं टीकास्त्र

मोठा भाऊ मनोहर चौधरी यांनी विश्वास दिला होता, की कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही. मात्र, त्यांची आर्थिक स्थितीदेखील फार चांगली नव्हती. याच कारणामुळे किशननं अखेर टोकाचं पाऊल उचललं. मृत तरुण विवाहित होता आणि त्याला दोन मुलं आणि एक मुलगीही आहे. आई आणि मुलाच्या मृत्यूमुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Suicide case, Suicide news