• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • घरगुती वादात उद्ध्वस्त झालं हसतं-खेळतं कुटुंब, भावांची ‘दारु पार्टी’ ठरलं कारण

घरगुती वादात उद्ध्वस्त झालं हसतं-खेळतं कुटुंब, भावांची ‘दारु पार्टी’ ठरलं कारण

आपला पती भावासोबत दारु पितो, या कारणावरून सुरु (Man commits suicide after murder of family members) झालेला वाद अखेर खून आणि आत्महत्येपर्यंत जाऊन पोहोचला

 • Share this:
  जबलपूर, 8 ऑक्टोबर : आपला पती भावासोबत दारु पितो, या कारणावरून सुरु (Man commits suicide after murder of family members) झालेला वाद अखेर खून आणि आत्महत्येपर्यंत जाऊन पोहोचला. शब्दाला शब्द वाढत जाऊनत त्याचे किती (Effects of family conflict) भयंकर परिणाम होऊ शकतात, हेच या घटनेतून समोर आलं आहे. मित्रासारख्या राहणाऱ्या दोन भावांच्या आयुष्यात त्यांच्या लग्नानंतर असं काही चित्र बदललं की प्रकरण थेट खुनापर्यंत गेलं. नेमकं काय घडलं? मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये मोठा भाऊ महेंद्र पटेल आणि छोटा भाऊ केशव पटेल हे एकत्र आणि गुण्यागोविंदानं राहत होते. परिसरातील श्रीमंत शेतकरी अशी त्यांची ओळख होती. महेंद्रचं काही वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं, तर केशवचं नुकतंच लग्न झालं होतं. अनेकदा महेंद्र आणि केशव हे एकत्र बसून दारू पित असत. केशवची पत्नी रोशनी याला आक्षेप घेत असे. अनेकदा या विषयावरून दोघांचं कडाक्याचं भांडण झालं होतं आणि चार महिन्यांत ती दोन वेळा रागाने माहेरी निघून गेली होती. महेंद्रच्या आयुष्यातही बदल केशव आणि रोशनीमध्ये होत असलेल्या भांडणांमुळे मोठा भाऊ महेंद्र आणि त्याची पत्नी नंदिनी यांच्यातही भांडणं व्हायला सुरुवात झाली होती. आपल्या पतीनं धाकट्या भावाच्या आणि त्याच्या पत्नीच्या वादात पडू नये, असं नंदिनीचं मत होतं. या सगळ्यामुळे कुटुंबातील स्वास्थ्य बिघडलं होतं आणि सतत भांडणं होत होती. महेंद्रचा टोकाचा निर्णय घटनेच्या दिवशी याच विषयावरून सुरु झालेल्या वादानंतर महेंद्रनं अगोदर रोशनीचा गमछानं गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर पत्नी नंदिनीवर चाकूनं हल्ला केला. दोघींना ठार केल्यानंतर त्यानं गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येनंतर पोलिसांना त्याची सुसाईड नोट मिळाली आहे. हे वाचा - शाळेनं मुलीला दिली 300 उठाबशा काढण्याची शिक्षा, आयुष्यभरासाठी आलं अपंगत्व सुसाईड नोटमधून समजलं सत्य महेंद्रनं सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या तपशीलानुसार त्याला रोशनीची हत्या करण्याची इच्छा नव्हती. सततच्या भांडणाला वैतागून आपण नंदिनीची हत्या करत होतो, मात्र तिला वाचवण्यासाठी रोशनी मध्ये आल्यामुळे तिची हत्या झाल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. आपण आत्महत्या करत असून त्यासाठी कुणालाही दोषी धरण्यात येऊ नये, असा उल्लेखही त्यात करण्यात आला आहे. या हल्ल्यातून नंदिनी थोडक्यात बचावली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
  Published by:desk news
  First published: