जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / नांदेड : जंगलात युवकाची दगडाने ठेचून हत्या; मृतदेहाशेजारी सापडलेल्या वस्तुंमुळे खळबळ

नांदेड : जंगलात युवकाची दगडाने ठेचून हत्या; मृतदेहाशेजारी सापडलेल्या वस्तुंमुळे खळबळ

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

हिमायतनगर शहरात राहणाऱ्या 23 वर्षीय पांडुरंग तोटेवाड या युवकाचा आरोपीनी निर्दयीपणे खून केला आहे. मात्र, ही हत्या का केली गेली, याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. (Murder News)

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नांदेड 10 सप्टेंबर : नांदेडमधून नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील वाशीच्या जंगलात एका युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. हिमायतनगर शहरात राहणाऱ्या 23 वर्षीय पांडुरंग तोटेवाड या युवकाचा आरोपीनी निर्दयीपणे खून केला आहे. मात्र, ही हत्या का केली गेली, याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. बाईकला टच केलं म्हणून शरीरावर दिल्या असंख्य जखमा, ‘मर्डर’चा हादरवणारा VIDEO कॅमेऱ्याद कैद पांडुरंग तोटेवाड नावाचा युवक सासरी जातो असं सांगून शुक्रवारी सकाळी घराबाहेर पडला होता. मात्र, दुपारी त्याचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो नेमका कोणासोबत गेला होता? कुठे गेला होता? याचा तपास पोलीस सध्या करत आहेत. मात्र, या युवकाच्या मृतदेहाशेजारी सापडलेल्या वस्तुंमुळे एकच खळबळ उडाली आहे. या युवकाच्या मृतदेहाशेजारी अघोरी पूजेचं साहित्य सापडलं आहे. मृतदेहाशेजारी लिंबू, तांब्या, फुले आढळल्यानं हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. मृताच्या कुटुंबीयांनी नरबळीची शंका उपस्थित केली आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. नोकरीच्या शोधात मुंबईत आला भावोजी, अन या कारणामुळे मेहुण्याने केलं भयानक कृत्य पांडुरंग लक्ष्मण तोटेवाड याचा मृतदेह हिमायतनगर - तालुक्यातील तेलंगणा बॉर्डरवर असलेल्या वाशीच्या जंगलात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला होता. मयत सासरी निघालेला असताना आरोपींनी त्याला बोलावून वाशीच्या जंगल भागात नेऊन इतर साथीदारांच्या मदतीने दगडाने ठेचून त्याची हत्या केली. यानंतर हा खून अपघात असल्याचं भासविण्यासाठी पांडुरंगचा चेहरा विद्रुप केला, अशी माहिती मृताच्या नातेवाईकांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात