मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /तरुणाचं Ex-Girlfriend सोबत विकृत कृत्य; आधी जबर मारहाण, मग जिवंतच सूटकेसमध्ये भरलं अन्..

तरुणाचं Ex-Girlfriend सोबत विकृत कृत्य; आधी जबर मारहाण, मग जिवंतच सूटकेसमध्ये भरलं अन्..

जेवियरनं वॅलेरीला टेपनं बांधलं आणि जिवंतच एका सूट केसमध्ये टाकलं (Man Stuffs Girlfriend in Suitcase) . यानंतर तो गाडीमध्ये ही सूट केस १० मील दूर घेऊन गेला आणि एका जंगलाच्या परिसरात ती टाकून दिली

जेवियरनं वॅलेरीला टेपनं बांधलं आणि जिवंतच एका सूट केसमध्ये टाकलं (Man Stuffs Girlfriend in Suitcase) . यानंतर तो गाडीमध्ये ही सूट केस १० मील दूर घेऊन गेला आणि एका जंगलाच्या परिसरात ती टाकून दिली

जेवियरनं वॅलेरीला टेपनं बांधलं आणि जिवंतच एका सूट केसमध्ये टाकलं (Man Stuffs Girlfriend in Suitcase) . यानंतर तो गाडीमध्ये ही सूट केस १० मील दूर घेऊन गेला आणि एका जंगलाच्या परिसरात ती टाकून दिली

नवी दिल्ली 27 सप्टेंबर : एखाद्यावर प्रेम करणं सोपं असतं, मात्र ते प्रेम शेवटपर्यंत टिकवणं तितकंच अवघड. अनेकदा कपलकडून अशा काही चुका होतात, ज्यामुळे त्यांच्या नात्यात (Relationship) दुरावा येतो आणि अनेकदा हे कपल वेगळी होतात. मात्र, वेगळं झाल्यानंतर एखाद्या प्रियकरानं थेट आपल्या प्रेयसीचाच जीव घेतला तर ही हैराण करणारी बाब असेल. अमेरिकेतून (America) नुकतंच असंच एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. यात एका व्यक्तीनं बदला घेण्यासाठी आपल्या एक्स गर्लफ्रेंडची निर्दयीपणे हत्या केली (Man Brutally Killed Ex Girlfriend).

अमेरिकेच्या कनेक्टिकट (Connecticut) येथे 25 वर्षीय जेवियर ड सिल्वा रोजासला कोर्टानं 30 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनाली. कारण त्यानं आपल्या एक्स गर्लफ्रेंडची हत्या केली. डेली स्टारच्या वृत्तानुसार, कोर्टात सांगितलं गेलं की जेवियर आपली गर्लफ्रेंड वॅलेरी रीज हिच्या घरी २८ जानेवारी २०१९ ला पोहोचला. घरात प्रवेश करण्याआधी त्यानं आपला फोन फ्लाईट मोडवर टाकला. घरात दोघांमध्ये वाद झाला. ही भांडणं मारहाणीत बदलली.

Porn Addict पतीच्या सवयीला कंटाळून महिलेनं घेतला मोठा निर्णय; सुरू केलं हे काम

या भांडणात तरुणीच्या डोक्याला मार लागला. याशिवाय तिच्या चेहऱ्यावर मार लागला. यानंतर जेवियरनं वॅलेरीला टेपनं बांधलं आणि जिवंतच एका सूट केसमध्ये टाकलं (Man Stuffs Girlfriend in Suitcase) . यानंतर तो गाडीमध्ये ही सूट केस १० मील दूर घेऊन गेला आणि एका जंगलाच्या परिसरात ती टाकून दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दम कोंडल्यानं या तरुणीचा मृत्यू झाला. दोन दिवस तिचा काहीही तपास लागला नाही. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली.

पोलिसांनी जेवियरकडे चौकशी केली असता त्यानं सांगितलं, की तो तिला शेवटचं भेटला तेव्हा संबंध ठेवत असताना वॅलेरी जमिनीवर कोसळली आणि तिला गंभीर दुखापत झाली. यानंतर जवळपास एका आठवड्यानं ती सुट केस पोलिसांना सापडली. यावर जेवियरचा डीएनए आढळला आणि वॅलेरीच्या नखांमध्येही त्याच्या डीएनएचे सॅम्पल आढळले. यादरम्यान जेवियरनं वॅलेरीचा लॅपटॉप आणि डेबिट कार्डही चोरलं होतं.

VIDEO: गर्दीच्या ठिकाणी Bikini घालून पोल डान्स करू लागला तरुण; बघत राहिले लोक

जेवियरनं या तरुणीच्या खात्यातून ४ लाख रुपये काढले होते. पोलिसांनी याबाबत माहिती मिळताच त्यांनी तरुणाला अटक केली. त्यानंही आपला गुन्हा मान्य केला आणि २३ सप्टेंबरला कोर्टानं त्याला ३० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यानंतर आरोपीनं वॅलेरीच्या कुटुंबीयांची माफीही मागितली, मात्र तिचे कुटुंबीय अतिशय दुःखी आहेत.

First published:

Tags: Crime, Girlfriend, Murder Mystery