Home /News /crime /

Buldhana: प्री वेडिंग शूट केल्यावर रात्री एकत्र मुक्काम, दुसऱ्या दिवशी तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार

Buldhana: प्री वेडिंग शूट केल्यावर रात्री एकत्र मुक्काम, दुसऱ्या दिवशी तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

चिखली तालुक्यातील एका 20 वर्षीय मुलगी आणि 25 वर्षीय मुलाचे लग्न (Marriage) ठरले होते. जानेवारी महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला. मुलगा इंजिनिअर आहे. पुण्याला तो एका कंपनीत नोकरी करतो. कोरोना काळापासून त्याचे वर्क फ्रॉम होम (Work From Home) सुरू आहे.

पुढे वाचा ...
  बुलडाणा, 25 मे : सध्या लग्नाचा (Marriage Season) मौसम सुरू आहे. त्यात अनेक ट्रेंड (Trend) आता समोर येत आहेत. लग्नात आता प्री-वेडिंग (Pre Wedding), पोस्ट वेडिंग (Post Wedding) शूट हा ट्रेंड सध्या फार चर्चेत आहे. याच पोस्ट वेंडिग शूट दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नेमकं काय घडलं? बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे हा प्रकार घडला आहे. प्री वेंडिग शूट (Pre Wedding Shoot) दरम्यानच एका कारणामुळे तरुणाने लग्न मोडले आहे. होणाऱ्या नवऱ्यासोबत एक तरुणी प्री वेडिंग शूटसाठी गोव्याला (Goa) गेली होती. मुक्कामाला रात्री दोन्हीही एकाच खोलीत होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यावर नवरदेवाने तरुणाने जे सांगितले त्यामुळे तिला धक्काच बसला. मला तु जशी हवी होतीस तशी तू नाहीस, असे म्हणत थेट त्या तरुणाने लग्नच मोडले. या प्रकारानंतर मुलीच्या कुटुंबीयांनाही धक्का बसला. तरुणाने महागडा मोबाईलही घेऊन दिला - चिखली तालुक्यातील एका 20 वर्षीय मुलगी आणि 25 वर्षीय मुलाचे लग्न (Marriage) ठरले होते. जानेवारी महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला. मुलगा इंजिनिअर आहे. पुण्याला तो एका कंपनीत नोकरी करतो. कोरोना काळापासून त्याचे वर्क फ्रॉम होम (Work From Home) सुरू आहे. या तरुण-तरुणीचा साखरपुडा झाला होता. यानंतर तरुणाने तिला महागडा मोबाईल घेऊन दिला होता. यानंतर ते दोघो तासन् तास बोलत होते. वेगवेगळ्या रुम बुक केल्या तरी तरुणाने तिला रात्री बोलाविले -  आजच्या तरुण-तरुणींना लग्नाआधी प्री वेडिंग शूटची आवड असते, तशी या दोघांनाही प्री वेडिंग शूट करायचे होते. यामुळे तरुण, तरुणीसह तिच्या नात्यातली एक जवळची मैत्रीण आणि दोन फोटोग्राफर प्री वेडिंग शूटसाठी गोव्याला गेले. तिथे गेल्यावर त्यांनी रुम बुक केले. दिवसभर फोटो, व्हिडिओ शूट केल्यावर रात्री हॉटेलात जेवण केले. यात तिची मैत्रिण आणि तिच्यासाठी एक रुम आणि फोटोग्राफर स्टाफसाठी एक रुम तसेच तरुणाने त्याच्यासाठी एक अशा तीन रुम बुक केल्या. जेवणानंतर रात्री तरुणाने तिला आपल्या रुममध्ये बोलावले. यानंतर दोघांनी सोबत काढली. हेही वाचा - Father Killed Daughter : प्रियकराशी बोलत होती 20 वर्षीय तरुणी, बापाने रागाच्या भरात केली हत्या
  मात्र, सकाळी तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला. या तरुणाने झोपेतून उठल्यावर आपला मोबाईल फोडला, तसेच स्वत:च्या अंगावरील कपडे फाडले. तसेच मला तु जशी हवी होतीस, तसे नाही, असे म्हणत आपले लग्न मोडले. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्याचे तिच्या आईवडिलांनी टाळले आहे. सामाजिक स्तरावर तोडगा काढण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरू आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Buldhana news, Marriage, Pre wedding photo shoot

  पुढील बातम्या