नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा, 24 मे : वर्धा (wardha) जिल्ह्याच्या सेवाग्राम रेल्वे स्थानकावर (sevagram railway station) एक प्रवाशी रेल्वे थांबली आणि अचानक एक प्रवाशाने उतरून स्थानकावरील रेल्वे पोलिसाला अल्पवयीन मुलीचे अपहरण (kidnapping) करून नेत असल्याची धक्कादायक माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी तातडीने धाव घेऊन या मुलीची सुटका केली. या प्रकरणी स्थानकावरील आरपीएफच्या जवानांनी धरपकड केली असून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार राज्यातील पूर्णिया गावातील अवघ्या 16 वर्षीय मुलीचे अपहरण करुन रेल्वेगाडीने घेऊन जात असलेल्या दोन आरोपींची सेवाग्राम रेल्वे पोलिसांनी अटक केली. मोहम्मद इमामूल आणि गुड्डू होना (रा. गुदरी मोहल्ला वॉर्ड १४ फारबिसगंज अररिया, बिहार) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. या दोघांनी अल्पवयीन मुलीला बिहार जिल्ह्यातील पूर्णिया गावातून पळवून नेत संघमित्रा एक्स्प्रेसमधून घेऊन जात होते. ( देशात ऑलिम्पिक चळवळ मजबूत होण्यासाठी प्रयत्नशील : नीता अंबानी ) एक्स्प्रेस सेवाग्राम स्थानकावरील फलाट क्रमांक 4 वर थांबली असता एक प्रवाशी धावत आला आणि त्याने एका मुलीचे अपहरण करून आणल्याची माहिती कर्तव्यावर असलेले उपनिरीक्षक ए.के. शर्मा यांना सांगितली. त्यांनी फलाटावर कर्तव्य बजावणाऱ्या काही जवानांना सोबत घेत तत्काळ एस ३ कोचमध्ये जात अल्पवयीन मुलीची आणि दोन युवकांची चौकशी करुन त्यांना ताब्यात घेतले असता त्या दोघांनी मुलीला पळवून नेत असल्याचे समजले. ( सई लोकूरचं नवऱ्यासोबत रोमॅंटिक फोटोशूट; पैठणीचा घागरा अन् जॅकेटनं दिला हटके लुक ) रेल्वे पोलिसांनी चाईल्ड लाईनशी संपर्क साधत मुलीची वैद्यकीय तपासणी करुन त्यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर बिहार येथून आलेल्या पोलिसांना अल्पवयीन मुलींसह आरोपीला ताब्यात दिले. आरोपीसह मुलगी हे रेल्वेतून खोट्या नावाने प्रवास करत होती. रेल्वे पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर यांची नावे वेगळी असून मुलगी अल्पवयीन असल्याचं समोर आलं. अल्पवयीन मुलीसह दोन्ही आरोपींना वर्धा रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी बिहार पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.