राहुल खंदारे /मलकापूर, 9 सप्टेंबर : घरगुती कारणावरून आपल्या जन्मदात्या बापाला पोटच्या मुलीने संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या वडिलांकडे (Crime) राहण्याचा हट्ट करणाऱ्या मुलीला वडिलांनी आमच्या घरी (Malkapur) राहू नको असं म्हटल्या नंतर मुलीचे चुलत भावाच्या साह्याने आपल्या बापाला (Father) ठार (died) केले. घरी राहण्याच्या कारणावरून बाप आणि मुली मध्ये क्षुल्लक वाद झाला होता त्यातच मुलीचे भावाच्या साहाय्याने बापाला ठार मारले ही घटना घडली.
गुलाब यादव रावणचौरे हे वडील आपल्या मुलीचा माहेरी घरी आमच्या कडे राहू नको तू कुठं पण राहा अस म्हणत असतांना अनेकदा वाद झाला पण आज वाद विकोपाला गेला आणि त्यात बापाचा खून झाला पोलिसांनी (Police) देखील प्रकरण गंभीर असून तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपीला ताब्यात घेतले आहे. मागील काही काळापासून या प्रकारणात वडील आणि मुलीचे वाद सुरू होते. त्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या शेजाऱ्यांनी हा नेहमी वाद मिटवता घेतला होता.
नशीबवान! 'प्लेन, ट्रेन, कार, बस' 7 भयंकर अपघात; वारंवार मृत्यूला दिला चकवा
परंतु आता या क्षुल्लक कारणामुळे मुलीनेच थेट आपल्या पित्याचा खून केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आता या प्रकरणामुळे पोलिसांसमोरही एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. महाराष्ट्रात मागील काही काळापासून गुन्ह्याच्या घटनेत वाढ होत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्हं उपस्थित केले जात आहे. आता मलकापूरच्या या घटनेमुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Father, Police