जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / सरपंच प्रवीण गोपाळे हत्याकांडात मोठी अपडेट समोर; हल्लेखोरांनी आधी रेकी केली अन् नंतर 25 सेकंदात..

सरपंच प्रवीण गोपाळे हत्याकांडात मोठी अपडेट समोर; हल्लेखोरांनी आधी रेकी केली अन् नंतर 25 सेकंदात..

पुण्यामध्ये सरपंचाची हत्या

पुण्यामध्ये सरपंचाची हत्या

सरपंच प्रवीण गोपाळे यांची शनिवारी रात्री 9च्या सुमारास जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांड प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे.

  • -MIN READ Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

मावळ, 2  एप्रिल, गणेश दुडम : प्रति शिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळमधील शिरगावच्या सरपंचांवर शनिवारी अज्ञात हल्लेखोरांनी धरादार शस्त्रांनी वार केल्याची घटना घडली होती. या घटनेत सरपंच प्रवीण गोपाळे यांचा मृत्यू झाला. या घटनेनं पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आता या घटनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपींनी प्रवीण गोपाळे यांच्या हत्येपूर्वी परिसराची रेकी केल्याची माहिती समोर येत आहे. हल्लेखोरांकडून परिसराची रेकी मिळत असलेल्या माहितीप्रमाणे सरपंच प्रवीण गोपाळे यांची शनिवारी रात्री 9च्या सुमारास जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली. हत्येपूर्वी आरोपींनी या परिसराची रेकी केली होती. हत्येच्या आधी दोन हल्लेखोरांनी परिसरात येऊन रेकी केली, त्यानंतर संबंधित व्यक्ती प्रवीण गोपाळेच असल्याची खात्री पटल्यानंतर तीन हल्लेखोरांनी अवघ्या 25 सेकंदात गोपाळे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या केली. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. ठाण्यात पोलीस भरतीमध्ये गैरप्रकार; एकाला अटक, कॉपीची पद्धत बघून पोलीसही चक्रावले नागरिक आक्रमक   दरम्यान प्रवीण गोपाळे यांची हत्या करणाऱ्या आरोपींना त्वरित जेरबंद करावे या मागणीसाठी आज सकाळी प्रति शिर्डी शिरगावं ग्रामस्थांनी शिरगावं परंदवाडी पोलीस स्टेशनला घेराव घातला. जोपर्यंत आरोपींना अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही  मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा येथील ग्रामस्थांनी घेतल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात