नांदेड, 26 जानेवारी : नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्याकांडातील तपास यंत्रणांना मोठे यश आले आहे. संजय बियाणी यांच्या हत्याकांडातील प्रमुख शूटर दीपक रांगा याला राष्ट्रीय तपास यंत्रणा पथकाने अटक केली आहे. नेपाळ बॉर्डरवरुन काल दीपक रांगा याला अटक करण्यात आली.
गेल्या 5 एप्रिल रोजी नांदेड मध्ये संजय बियाणी यांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यात दीपक रांगा याने बियाणी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. हाच मुख्य शूटर असल्याची महिती नांदेड पोलीस दलातील सूत्रांनी दिली. दीपक रांगा हा आरोपी अनेक देशविधातक गुन्ह्यात सहभागी आहे. कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंघ रींदा यांच्या सांगण्यावरून खंडणीसाठी बियाणी यांची हत्या करण्यात आली होती.
बियाणी हत्याकांडातील 15 आरोपींना नांदेड पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. एका अल्पवयीन शुटरला दिल्ली पोलिसांनी गुजरात मधून अटक केली होती. आता दूसऱ्याला शुटरलादेखील अटक करण्यात आली. दरम्यान, दीपक रांगा याच्या ओळख परेडसाठी नांदेड पोलिसांचे एक पथक पंजाबमध्ये दाखल झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. बियाणी हत्याकांडात थेट रिंदाचा सहभाग असल्याने शिवाय दोन शूटर दहशतवादी गुन्ह्यात सहभागी असल्याने संजय बियाणी हत्याकांडाचा तपास देखील आता राष्ट्रीय तपास यंत्रनेकडे जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा - मुलाच्या वयाच्या तरुणासोबत अफेयर, समजावूनही महिलेने ऐकले नाही, पतीने तिचा विषयच संपवला!
संजय बियाणी यांची 5 एप्रिल 2022 रोजी दोन मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. संजय बियाणी यांच्या शारदा नगर येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर दबा धरून बसलेल्या दोन आरोपींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. शहरातील प्रसिद्ध बिल्डरच्या झालेल्या हत्येनं संपूर्ण नांदेड जिल्हा हादरला होता. तसंच बांधकाम व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती.
संजय बियाणी हे नाव नायगाव तालुक्यातील कोलंबी गावचे ते रहिवाशी होते. 10 वर्षापूर्वी संजय बियाणी नांदेडला स्थायिक झाले. सुरुवातीला त्यांनी स्थानिक केबल नेटवर्कमध्ये जाहिरात एजन्सी चालवली. नंतर त्यांनी बांधकाम व्यवसाय सुरू केला आणि अल्पावधीतच ते मोठे व्यावसायिक झाले. जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेत्यांशी त्याचे चांगले संबंध होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.