Home /News /pune /

पुण्यात MPSCच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या स्वप्निलची आत्महत्या, सुसाईट नोट समोर

पुण्यात MPSCच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या स्वप्निलची आत्महत्या, सुसाईट नोट समोर

Pune MPSC Student Suicide Note: MPSCची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्यानं पुण्यात (Pune)आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्निलनं सुसाईड नोट लिहिली होती.

    पुणे, 04 जुलै: MPSCची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्यानं पुण्यात (Pune)आत्महत्या केली आहे. 24 वर्षीय स्वप्निल लोणकर यानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (suicide)केल्यानं एकच खळबळ उडाली. पुण्यातल्या फुरसुंगी परिसरात ही घटना घडली. स्वप्निलनं अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्यात तो पास देखील झाला होता. मात्र यानंतरही त्याला नोकरी मिळाली नाही आणि याच नैराश्यातून त्यानं हे धक्कादायक पाऊल उचललं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्निलनं सुसाईड नोट लिहिली होती. मी घाबरलो, खचलो मुळीच नाही.फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता, एमपीएससी मायाजाल आहे यामध्ये पडू नका, असं त्यानं आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. पुण्यातल्या फुरसुंगीमध्ये स्वप्निल आपले आईवडील आणि बहिणीसोबत राहत होता. शनिवार पेठेत स्वप्निलच्या वडिलांची प्रिटींग प्रेस आहे. स्वप्निलचे आईवडील तिथेच काम करतात. नेहमीप्रमाणे दोघे जण प्रेसमध्ये गेले आणि स्वप्निलची बहिणी बाहेर गेली होती. दुपारच्या सुमारास स्वप्निलची बहिण घरी परत आली. घरी परत आल्यानंतर तिला स्वप्निल कुठेच दिसला नाही. म्हणून ती त्याच्या खोलीत गेली. खोलीत पाहिले असता त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं दिसलं. तात्काळ बहिणीनं ही माहिती आईवडिलांना दिली. त्यानंतर स्वप्निलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हडपसर पोलिसांनी या आत्महत्या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. हेही वाचा-  साखर कारखान्यांत गैरव्यवहार; कारवाईसाठी अमित शहांना पत्र, 'ते' 30 कारखाने कोणाचे? स्वप्निलची पार्श्वभूमी स्वप्निल सुनील लोणकर (वय 24) असं या विद्यार्थ्यांचं नाव आहे. स्वप्निल हा सिव्हिल इंजिनिअर (Civil engineer) होता आणि त्यानं मोठ्या जिद्दीनं MPSC ची परीक्षा दिली होती आणि उत्तीर्णही झाला होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्याला नोकरी मिळाली नव्हती. इंजिनिअरींग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यानं MPSC च्या परीक्षेची तयारी सुरु केली. स्वप्निल 2019 मध्ये झालेल्या एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाला होता. मात्र कोरोनाच्या निर्बंधामुळे त्याची मुलाखत दीड वर्षांपासून झाली नव्हती. 2020 साली त्याने पूर्व परीक्षाही दिली. त्यातही तो उत्तीर्ण झाला. हेही वाचा- रानडुक्काराचा शेतमजूर महिलेवर भीषण हल्ला, शरिरापासून हात झाला वेगळा! स्वप्निलला दहावीत 91 टक्के मिळाले होते. तो अनेक सामाजिक उपक्रमांमधेही तो सहभागी असायचा. एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालो की वडिलांनी गावाकडे घर बांधण्यासाठी घेतलेले कर्ज फेडाण्याचं स्वप्निलच स्वप्न होतं.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Mpsc examination, Pune, Suicide

    पुढील बातम्या