जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / शाळकरी मुलगी विकतेय दारूचे 'फुगे', देहूरोडमधला व्हिडीओ व्हायरल, पोलीस आहे कुठे?

शाळकरी मुलगी विकतेय दारूचे 'फुगे', देहूरोडमधला व्हिडीओ व्हायरल, पोलीस आहे कुठे?

व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयातील देहूरोड पोलीस खडबडून जागे झाले आहेत.

व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयातील देहूरोड पोलीस खडबडून जागे झाले आहेत.

व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोड पोलीस खडबडून जागे झाले आहेत.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

गणेश दुडम, प्रतिनिधी मावळ, 28 ऑगस्ट : पुणे (pune) जिल्ह्यातील देहूरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका सजग नागरिकाने हात भट्टी दारूचा पर्दाफाश करत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळकरी गणवेशात एक विद्यार्थिनी दारूचे फुगे विकतानाचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोड पोलीस खडबडून जागे झाले आहेत. देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैद्यधंदे, गावठी दारूचे अड्डे असताना ही पोलीस बघ्याची भूमिका घेत आहे. मागील आठवड्यात मावळचे आमदार सुनील शेळके यांनी कामशेत पोलीस स्टेशनवर गावठी दारूच्या विरोधात मोर्चा काढला होता. कोथूर्ण येथील सात वर्षीय निर्भयावर अत्याचार झाला होता. या घटना परत मावळात होऊ नये म्हणून मावळ आमदाराने कंबर कसली होती. तर दुसरीकडे देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हात भट्टी सुरू आहे आणि त्यात आत्ता शाळकरी मुलीच्या व्हिडिओ समोर आला आहे. एक शाळकरी मुलगी पिशवांमध्ये पॅक असलेली दारू काही तरुणांना आणून देत आहे, हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (सहा मुलांची आई होती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये, प्रियकराने लग्नासाठी टाळाटाळ केल्यावर रिक्षातच केला त्याचा घात) हा व्हिडीओ समोर आल्यामुळे मावळमध्ये एकच खळबळ उडाली. या बाबत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गुन्हे शाखेला चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांच्या आशीर्वादाने हे अवैद्य धंदे सुरु असतील तर त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (संतापजनक! बोटं घालून पत्नीचा डोळा काढला बाहेर; वारंवार माहेरी जाण्याची अशी दिली शिक्षा) देहूरोड परिसरात अवैद्यधंदे , गावठी दारू बंद होईल अशी आशा नागरिकांना होती.परंतु, हे धंदे बंद होत नसल्याने सजग नागरिक श्रीजित रमेशन यांनी स्टिंग ऑपरेशन करून ही बाब उघडकीस आणली आता याबाबत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे काय कारवाई करतात ते पाहणे महत्वाचं असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात