जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / मध्य प्रदेशातून आलेला मोठा शस्त्रसाठा पुण्यात जप्त; 7 जणांना अटक

मध्य प्रदेशातून आलेला मोठा शस्त्रसाठा पुण्यात जप्त; 7 जणांना अटक

पुण्यातून मोठा शस्त्रसाठा जप्त

पुण्यातून मोठा शस्त्रसाठा जप्त

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 11 मार्च :  पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रसाठ्यामध्ये एकूण 17 पिस्टल आणि 13 जिवंत काडतुसांचा समावेश आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट सहाने ही कारवाई केली आहे. या आरोपींनी मध्य प्रदेशमधून हे गावठी पिस्टल आणल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई  मिळालेल्या माहितीनुसार, 2 पिस्टल विक्री करणारे तरुण वाघोली भागात असलेल्या एका लॉजवर वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून या 2 जणांना ताब्यात घेतले असता त्यांच्याजवळ 1 गावठी पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे आढळून आली. पिस्टल घेणाऱ्या तरुणांही अटक   अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून पिस्टल घेणाऱ्या तरुणांना देखील पोलिसांनी अटक केली. हे सगळे जण अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. या आरोपींकडून 13 गावठी बनावटीच्या पिस्टलसह 4 जिवंत काडतुसे तसेच एक चार चाकी वाहन, मोबाईल असा एकूण 21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचं मरण स्वस्त होतंय का? कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात चार दिवसांत चार जणांनी संपवलं आयुष्य आरोपींची नावं  हनुमंत गोल्हार (24), प्रदीप गायकवाड (25), अरविंद पोटफोडे (38), शुभम गरजे (25), ऋषिकेश वाघ (25), अमोल शिंदे (25) असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर दुसऱ्या एका कारवाईत सुसगावमधून पोलिसांनी साहिल चांदेरे (21) याच्याकडून 4 पिस्टलसह 9 जिवंत काडतुसे असा दोन लाख एकोनपन्नास हजार रुपयंचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात