जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शेतकऱ्यांचं मरण स्वस्त होतंय का? कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात चार दिवसांत चार जणांनी संपवलं आयुष्य

शेतकऱ्यांचं मरण स्वस्त होतंय का? कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात चार दिवसांत चार जणांनी संपवलं आयुष्य

4 दिवसांत 4 शेतकऱ्यांनी संपवलं  आयुष्य

4 दिवसांत 4 शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य

छत्रपती संभाजीनगरात आणखी एक शेतकऱ्यानं आपलं जीवन संपवलं आहे. गेल्या चार दिवसांमध्ये चार शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ Aurangabad,Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

छत्रपती संभाजीनगर, 11 मार्च, अविनाश कानडजे : छत्रपती संभाजीनगरात आणखी एक शेतकऱ्यानं आपलं जीवन संपवलं आहे. गेल्या चार दिवसांमध्ये चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर हा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा जिल्हा आहे. कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात गेल्या चार दिवसांमध्ये चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं आहे. नापिकी आणि डोक्यावर असलेल्या कर्जाचा बोजा यामुळे या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या  काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. आता आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. खुलताबाद तालुक्यातील दरेगाव येथील अंबादास गायकवाड या 35 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या  केली आहे. गायकवाड यांची दरेगाव शिवारात पाच एकर शेती आहे. मात्र यंदा वर्षभर अतिवृष्टी झाल्यानं शेतीला मोठा फटका बसला. तोंडचा घास हिरवला गेला. त्यामुळे आता घेतलेले कर्ज फेडायचे कसे या विवंचनेमध्ये असलेल्या अंबादास गायकवाड यांनी घरासमोरील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. कापसाला भाव मिळत नसल्यानं आत्महत्या   अंबादास गायकवाड यांच्याआधी अशोक भिका शिरसाट या शेतकऱ्यानं  8 मार्च रोजी आपलं आयुष्य संपवलं. अशोक शिरसाट हे छत्रपती संभाजीनगर येथील गंगापूर तालुक्यातील वाहेगावचे रहिवासी होते. कापसाला अपेक्षित भाव न मिळाल्यानं कर्ज फेडणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. Video : ‘चल पैसे निकाल’; फायनान्स कार्यालयात घुसून गोळीबार, छ. संभाजीनगर हादरलं टरबुजाला भाव मिळत नसल्यामुळे संपवलं जीवन      या आधीही दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सिल्लोडच्या अंधारी गावात ही घटना घडली आहे. एकापाठोपाठ दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भागिनाथ बाळूबा पांडव (वय 46), जनार्दन सुपडू तायडे (वय 55 वर्षे) अशी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावं आहेत. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातून गेले. त्यानंतर आता शेतात लावलेले टरबुजाचे म्हणावे तसे उत्पन्न झाले नाही. त्यातच डोक्यावर असलेल्या कर्जाचा डोंगर या निराशेपोटी या शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात