तुषार कोहळे, प्रतिनिधी
नागपूर, 19 एप्रिल : नागपूरला (Nagpur) एकीकडे कोरोनाने (Corona) विळखा घातला आहे तर दुसरीकडे गुन्हेगारीचे सत्र सुरूच आहे. शहरातील पाचपावली भागात एका लेडी डॉनचा (lady don pinki varma murder) गुंडांनी पाठलाग करून चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एखाद्या सिनेमाला शोभेल अशा थरारक घटनेनं नागपूर शहर हादरलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंकी वर्मा असं या लेडी डॉनचे नाव आहे. आज संध्याकाळी पाचपावली भागात एक तरुणी आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा लोकांच्या दारात, घरात व मोहल्ल्याच्या रस्त्याने पळत होती आणि गुंड चाकू घेऊन तिच्या पाठीमागे धावत होते. ती किंचाळत होती. मदतीची याचा करत होती, पण कोणी तिच्या मदतीला धावून आले नाही. गुंड तिच्या शरीरावर चाकूने सपासफ वार करत तिचा पाठलाग करत होते. शेवटचा प्रयत्न म्हणून ती स्वतःच्या घरात शिरली. गुंडांनी तिथे पण तिचा पिच्छा सोडला नाही. जखमेतून निघणाऱ्या रक्ताने ती रक्ताने भिजली, चाकूच्या वाराने तिचे कपडे फाटले व शेवटी ती खचली आणि खाली कोसळली. गुंडांनी आणखी वार केले व तेथून निघून गेले. रुग्णालयात पोहचण्या आधीच तिने प्राण सोडला.
पिंकी वर्मा सभावाला अत्यंत आक्रमक होती. बोलायला वाचाळ होती. तिची स्वतःची गॅंग होती. त्या जोराावर ती अवैध धंदे चालवत होती. तिच्या गँगमधल्या अनेक सदस्यांवर गंभीर गुन्हे दाखल होते. पिंकीची गॅंग दारू विक्री, जुगार भरवणे यासारख्या अवैद्य धंदे करत होती. त्यामुळे स्थानिक विरोधी टोळीच्या सदस्यांसोबत तिचे खटके उडत असे. मात्र, पिंकी ही महिला असल्याने अनेकांनी सुरवातीला तिच्याकडे दुर्लक्ष केले.
मात्र हळूहळू परिसरात पिंकी वर्माचा गुन्हेगारी जगतातील व्याप व दरारा वाढत चालला होता. तिची अनेक गुन्हेगारांसोबत उठबस वाढली होती. कोरोना काळात दारूची दुकाने बंद असल्याने तिचा अवैध दारूचा धंदा तेजीत होता. हे विरोधातील टोळीला पचनी पडत नव्हते. जुन्या वादाचे सूत पकडून आज दुसऱ्या गँगने तिचा काटा काढायचे ठरवले. पिंकी नेहमी प्रमाणे आज देखील दुपारच्या वेळेस आपल्या घरासमोरील ओट्यावर मित्रांसोबत बसली होती. संधीच्या शोधत असलेल्या गुंडांची नजर तिच्यावर पडली व तिचा पळण्याची संधी न देता गुंडांनी सर्वांच्या समोर चाकूने सपासप वार करत तिची हत्या केली.
IPL मध्ये महाराष्ट्राचे 3 खेळाडू, एक यशस्वी, दुसरा फेल, तिसऱ्याला संधीच नाही
या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून आरोपीची ओळख पटली असून पोलिसांची पथके आरोपीचा शोध घेत होती. एखाद्या चित्रपटात घडावा तसा हा घटनाक्रम होता. त्यामुळे या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली .
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nagpur