मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : आयपीएलमध्ये महाराष्ट्राचे 3 खेळाडू, एक यशस्वी, दुसरा फेल, तिसऱ्याला संधीच नाही

IPL 2021 : आयपीएलमध्ये महाराष्ट्राचे 3 खेळाडू, एक यशस्वी, दुसरा फेल, तिसऱ्याला संधीच नाही

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) महाराष्ट्राकडून (Maharashtra) स्थानिक क्रिकेट खेळणारे तीन खेळाडू सहभागी झाले आहेत. यातल्या दोन खेळाडूंना त्यांच्या टीमकडून खेळण्याची संधी मिळाली, तर एक जण अजूनही बेंचवर बसलेला आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 19 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) महाराष्ट्राकडून (Maharashtra) स्थानिक क्रिकेट खेळणारे तीन खेळाडू सहभागी झाले आहेत. यातल्या दोन खेळाडूंना त्यांच्या टीमकडून खेळण्याची संधी मिळाली, तर एक जण अजूनही बेंचवर बसलेला आहे. संधी मिळालेल्या ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) चमकदार कामगिरी करता आली नाही, तर राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) मात्र फॉर्ममध्ये आहे. केदार जाधवला (Kedar Jadhav) अजूनही सनरायजर्सने संधी दिलेली नाही.

मागच्या आयपीएलच्या शेवटच्या तिन्ही सामन्यांमध्ये अर्धशतक करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सच्या (CSK) ऋतुराज गायकवाडला धोनीने (MS Dhoni) तिन्ही सामन्यांमध्ये ओपनिंगची संधी दिली. दिल्लीविरुद्धच्या (Dehli Capitals) पहिल्या सामन्यात 5 रन, पंजाबविरुद्धही (Punjab Kings) 5 रन आणि राजस्थानविरुद्ध (Rajasthan Royals) 10 रन करुन ऋतुराज आऊट झाला. या तीन सामन्यांमध्ये त्याने 6.66 च्या सरासरीने आणि 54.05 च्या स्ट्राईक रेटने 20 रन केल्या आहेत.

दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळणाऱ्या राहुल त्रिपाठीने या मोसमात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हैदराबादविरुद्धच्या (SRH) सामन्यात राहुल त्रिपाठीने 29 बॉलमध्ये 53 रन केले, तर मुंबईविरुद्ध (Mumbai Indians) तो 5 बॉलमध्ये 5 रन करून आऊट झाला. आरसीबीविरुद्धच्या (RCB) मॅचमध्ये राहुल त्रिपाठीने 20 बॉलमध्ये 25 रनची खेळी केली. या सामन्यात त्याने फिल्डिंगही चांगली केली. वरुण चक्रवर्तीच्या बॉलिंगवर राहुल त्रिपाठीने विराट कोहलीचा भन्नाट कॅच पकडला. आयपीएलच्या या मोसमात त्याने 3 सामन्यांमध्ये 27.66 च्या सरासरीने आणि 153.70 च्या स्ट्राईक रेटने 83 रन केले आहेत.

महाराष्ट्राचा तिसरा खेळाडू केदार जाधव याला सनरायजर्स हैदराबादने लिलावात विकत घेतलं, पण त्याला अजून एकदाही खेळण्याची संधी मिळालेली नाही.

First published:

Tags: Cricket, IPL 2021, Maharashtra