Home /News /crime /

थरकाप फडवणारा प्रकार! मित्राने मित्राची केली हत्या; तंदूरमध्ये मृतदेह जळाला नाही म्हणून तुकडे तुकडे पुरले

थरकाप फडवणारा प्रकार! मित्राने मित्राची केली हत्या; तंदूरमध्ये मृतदेह जळाला नाही म्हणून तुकडे तुकडे पुरले

अखेर आरोपीने आपला गुन्हा कबुल केल्यानंतर मृतदेहाचे भाग बाहेर काढण्यात आले.

    पतियाळा, 27 मे : नशेच्या अवस्थेत एका मित्राने आपल्या दुसऱ्या व्यसनी मित्राची हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह घराच्या गच्चीवरील तंदूरमध्ये (Punjab News) टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मृतदेह पूर्णपणे जळाला नाही तर त्याचे तुकडे गेले. त्यातील एक भाग आपल्या काकाच्या घराजवळ पुरला आणि दुसरा भाग घराजवळील कच्च्या जमिनीत पुरला. मृत तरुण दोन दिवसांपासून घरी परतला नसल्यामुळे या गोष्टीचा खुलासा झाला. मृत तरुणाच्या आईने पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. आईने पोलिसांना सांगितलं की, तो दोन दिवसांपूर्वी मुलगा आपल्या मित्रासोबत गेला होता. पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल करीत आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली. शेवटी आरोपीने आपला गुन्हा (Crime News) कबुल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय दलजीत सिंग आणि 18 वर्षीय राम एकमेकांचे (Killed Friend) मित्र होते. दोघांनाही दारूचं व्यसन होतं आणि दोघेही नशामुक्ती केंद्रात उपचार घेऊन आले होते. दोन दिवसांपूर्वी दोघे दलजीत सिंग याच्या घरात बसले होते. दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरुन भांडण झालं. यादरम्यान रागाच्या भरात दलजीत सिंगने रामची हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याने घराच्या गच्चीवरील तंदूरमध्ये मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र तंदूरमध्ये मृतदेह पूर्णपणे जळाला नसल्याचं पाहून मृतदेहाचे दोन तुकडे केले. त्यातील एक भाग आपल्या शेजारी राहणाऱ्या घरात पुरला आणि एक भाग घराजवळी कच्च्या जमिनीत पुरलं. अखेर आरोपीने आपला गुन्हा कबुल केल्यानंतर मृतदेहाचे भाग बाहेर काढण्यात आले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime, Murder, Punjab

    पुढील बातम्या