बीड, 27 मे : बीड जिल्ह्यात अनैतिक संबंधांतून (Immoral Relation) एक धक्कादायक घटना घडली होती. तीन वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने (Beed District and Session Court) निकाल दिला आहे.
पतीचे अनैतिक संबंध असल्यामुळे संतापात पत्नीने त्याच्या प्रेयसीच्या साडेतीन वर्षाच्या मुलाचीच हत्या (Husband's Girlfriend Son Murder) केली होती. तिने आपल्या पतीच्या प्रेयसीच्या साडेतीन वर्षीय मुलाला नदीत बुडवून ठार मारले होते. तीन वर्षापूर्वी ही धक्कादायक घडना घडली होती. शारदा श्रीराम शिंदे (रा. शाहुनगर, बीड) असे त्या आरोपी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत महाजन यांनी या महिलेला दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
काय घडलं होतं -
शारदा हिचा पती श्रीराम शिंदे याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. ही महिला गढी कारखान्यावर काम करायची. त्याची सुरुवातीला या महिलेसोबत ओळख झाली. यानंतर त्यांचे सूत जुळले. तब्बल 15 वर्षांपूर्वी हे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. या अनैतिक संबंधांचा राग शारदाला अनावर झाला. या रागातूनच तिने धक्कादायक कृत्य केले. तिने आपल्या पतीच्या प्रेयसीचा मुलगा सार्थक याचा खून केला.
साडेतीन वर्षाच्या बालकाला बुडवून मारले -
शारदा ही प्रेयसीच्या घरात शिरली. त्यानंतर तिने 3 वर्ष 6 महिन्यांच्या सार्थकला उललले. यानंतर धानोरारोड बीड ते अंकुशनगर रस्त्यावरील पुलाजवळ आणले. येथे असलेल्या करपरा नदीत पात्रातील पाण्यात सार्थकला बुडवून त्याचा खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह हा करपरा नदी पात्रात फेकून दिला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. यानंतर याप्रकरणी सार्थकच्या आईने फिर्याद दिल्यानंतर शारदा उर्फ श्यामल श्रीराम शिंदे हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तिला आता तीन वर्षांनी न्यायालयाने तिला दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच पाचशे रुपये दंड सुनावला आहे. दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.