Home /News /crime /

तरुणीच्या बेडरुममध्ये घुसणे पडले चांगलेच महागात; विनयभंग केल्याने न्यायालयाने सुनावली शिक्षा

तरुणीच्या बेडरुममध्ये घुसणे पडले चांगलेच महागात; विनयभंग केल्याने न्यायालयाने सुनावली शिक्षा

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

Aurangabad crime: तरुणीच्या आजीने आरोपीला घरी बोलावले होते. त्याला या घटनेबाबत जाब विचारला असता, कुणाला सांगून नका. चूक झाली. मला चपलांनी हाणा, पण माफ करा, अशी विनवणी त्याने पीडितेच्या आजीलाही केली होती

  औरंगाबाद, 27 मे : सध्या विनयभंगाच्या, अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. दररोज कुठून ना कुठून विनयभंगाच्या (Molestation), महिला अत्याचाराच्या, अनैतिक संबंधांच्या (Immoral Relation) बातम्या समोर येत आहेत. अशीच औरंगाबादमध्ये (Aurangabad) 2018 मध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी तरुणाला केलेली चूक त्याला चांगलीच महागात पडली आहे. नेमकं काय घडलं होतं - आरोपी तरुण हा एका तरुणाच्या बेडरुमध्ये घुसला. तसेच त्याने यावेळी तिचा विनयभंगही केला होता. ही घटना 2018 मध्ये घडली होती. त्याला आता प्रथमवर्ग न्यायालयाने विना परवानगी घरात घुसल्याबद्दल 2 वर्षाचा साधा कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. इतकेच नव्हे तर तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एक वर्ष 4 महिन्याचा सश्रम कारावास आणि पाच हजार रुपयांचा दंडही सुनावला आहे. वैभव सुरेस दाणी (वय 27, रा. मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव आहे. विनयभंगाच्या घटनेनंतर त्याने पीडितेची माफी मागितली होती. तसेच या घटनेबाबत कुणाला सांगू नको, अशी विनंतीही केली होती. तरुणीच्या आजीने आरोपीला घरी बोलावले होते. त्याला या घटनेबाबत जाब विचारला असता, कुणाला सांगून नका. चूक झाली. मला चपलांनी हाणा, पण माफ करा, अशी विनवणी त्याने पीडितेच्या आजीलाही केली होती. मात्र, यानंतर पीडितेने फिर्याद दिली. पीडितेने आपल्या फिर्यादित काय म्हटले - पीडितेने याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तसेच तिने सांगितले की, आरोपी वैभव हा 19 फेब्रुवारी 2018 च्या सायंकाळी ती तिच्या बेडरुमध्ये असताना आला. तसेच यावेळी त्याने तिचा विनयभंग केला. यानंतर तरुणीने आरडाओरड केली असता त्याने तिथून पळ काढला. यानंतर पीडित तरुणीने हा प्रकार आपल्या आजीला सांगितला. त्यांनी आरोपीला जाब विचारला त्याने, याबाबत कुणाला सांगू नका. मला चपलांनी हाणा, अशी विनवणी केली होती. हेही वाचा - Live in Relationship : लिव्ह इन रिलेशनशिपचा धक्कादायक अंत; प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल
  दरम्यान, तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक एस. ए. गिते यांनी याप्रकरणी तपास केला आणि दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणी वेळी सहायक सरकारी वकील भागवत काकडे यांनी 4 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यानंतर बुधवारी प्रथम वर्ग न्यायाधीश एस. एस. मांजरेकर यांनी आरोपीला शिक्षा सुनावली. तर पैरवी अधिकारी म्हणून अंमलदार अनिक खलाने यांनी काम पाहिले.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Aurangabad, Crime news

  पुढील बातम्या