हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर, 08 नोव्हेंबर : चंद्रपूरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दोन गटातील जुन्या वादातून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या तरुणावर धारदार शस्त्रांनी वार करून शीर धडावेगळे करण्यात आले. या घटनेमुळे चंद्रपूरमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापूर निवासी परिसरात ही घटना घडली. दुर्गापूर मुख्य मार्गावर हे हत्याकांड घडले. महेश मेश्राम (वय 35) असं मृत तरुणाचे नाव आहे. महेशवर 3 ते 4 जणांनी मिळून प्राणघातक हल्ला केला. ( औरंगाबाद : प्राचार्याने चोरले कॉलेजमधील 10 लाख अन् खेळला ऑनलाईन रमी ) आरोपीनी आधी महेश मेश्राम याला बेदम मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याचं शीर धडावेगळे केलं. महेश मेश्राम याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात तर शीर काही अंतरावर पडलेले होते. मृतक महेश मेश्राम याची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. तो नुकताच कारागृहातून पॅरोलवर बाहेर आला होता. आरोपी आणि मृतकाचा वाद नेमका कशामुळे झाला याबाबत सविस्तर माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी संशयाच्या आधारे सध्या 2 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मुंबईत 48 तासांत 3 बालकांचा मृत्यू दरम्यान, मुंबईतील गोवंडी झोपडपट्टीत राहणाऱ्या एका कुटुंबातील तीन मुलांचा 48 तासांत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यातील कुपोषणामुळे एका बालकाचा मृत्यू झाला तर इतर दोघांच्या मृत्यूचे कारण कळू शकलेले नाही. तर या प्रकरणी चौकशी करण्यात येईल आणि मुलांचा मृत्यू कशामुळे झाला, याची तपासणी करण्यात येईल, अशी माहिती बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. (बापरे! एकाच दिवसात तीन ‘नरबळी’, अंधश्रद्धेतून घडल्या धक्कादायक घटना) तिन्ही मृत गोवंडीतील रफी नगर झोपडपट्टीतील रहिवासी होते. हे एम ईस्ट वॉर्डमध्ये आहे. हे वार्ड क्षयरोगाच्या रुग्णांसाठी कुप्रसिद्ध आहे. तर या घटनेनंतर मृत्यू आणि कुपोषणाच्या शक्यतेमुळे, स्थानिक लोक आता चिंतेत आहेत. अब्दुल रहीम खानने हसनैन (वय 5) आणि नूरैन (वय 3.5) यांनी त्यांचे दोन मुले तर रहिमचा मेहुणा मोहम्मद ईद खान यांनी त्यांचा एक वर्षाचा मुलगा फजल अली गमावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.