गडचिरोली, 09 नोव्हेंबर : महाराष्ट्रात माओवादी चळवळीमध्ये या ना त्या मार्गाने प्रवेश करणाऱ्या पहिल्या तरुणाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माओवादी चळवळीत प्रवेश करणारा पहिला स्थानिक तरुण असलेल्या जहाल माओवादी शंकरन्ना उर्फ आसम शिवन्नाचा मृत्यू झाला आहे. गडचिरोलीसह दंडकारण्यात गेली 41 वर्षे माओवादी चळवळीच्या प्रसारात शंकरन्नाने सशस्ञ लढ्यासह लेखन आणि गायनाच्या माध्यमातून माओवादी विचारधारेचा प्रसार केला होता. त्यातून 41 वर्षात शेकडो तरुण-तरुणींनी माओवादी संघटनेत प्रवेश केला होता. ( ‘महाराष्ट्रावर हैवानांचं राज्य, सिल्लोडचा बेडूक…’; ठाकरे गटाची सत्तारांवर टीका ) महाराष्ट्रातील माओवाद्याच्या पहिल्या सिरोंचा दलमचा सदस्य असलेल्या शंकरन्नाच्या नेतृत्वात माओवाद्यांची सांस्कृतिक उपसमिती तयार होऊन जिल्ह्यात चळवळीच्या प्रसारासाठी चेतना जननाटय मंडळाची स्थापना झाली होती. आसरल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आसमटोला येथील शंकरन्ना दलममध्ये 1982 मध्ये भरती झाल्यावर त्याच्या पुढाकारातून तीन वर्षांत 1985 पर्यंत चाळीसपेक्षा जास्त तरुण तरुणी माओवादी चळवळीत दाखल झाले होते. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यासह पूर्व विदर्मातील तीन जिल्ह्यात ही चळवळ पसरली. (‘फ्लिपकार्ट’च्या वस्तू अचानक गायब, शोध घेताच कंपनीला धक्का, मुंबईतून तिघांना अटक) शंकरन्नाने माओवादी चळवळीसाठी शेकडो गाणी लिहिली असून त्या गाण्याच्या प्रभावातून शेकडो तरुणांनी गेली 41 वर्षांत माओवादी चळवळीत प्रवेश केला होता. शंकरन्नावर लाखो रुपयांचे बक्षीस आहे. शंकरन्नाच्या मृत्यूची माओवाद्यानी एका पञातून कबुली देऊन त्याप्रित्यर्थात 22 नोव्हेंबरला शोक दिवस पाळण्याचे आवाहन केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.