Home /News /crime /

लज्जास्पद! पोटच्या मुलीवर रेप करण्यासाठी आईच करायची प्रवृत्त; न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा

लज्जास्पद! पोटच्या मुलीवर रेप करण्यासाठी आईच करायची प्रवृत्त; न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा

या महिलेनं आपल्या मित्राला तिच्या 16 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यास वारंवार प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. याशिवाय, न्यायालयाने दोषींना लाखो रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

तिरुवनंतपुरम, 24 फेब्रुवारी: केरळमध्ये नातेसंबंधांना काळिमा फासणारं विकृत प्रकरण समोर आलं आहे. आईच आपल्या पोटच्या मुलीच्या अस्मितेची शत्रू बनल्याचं या प्रकरणात दिसून येतं. या प्रकरणी न्यायालयाने एका 50 वर्षाच्या महिलेला 10 वर्ष सश्रम कारावासाची (Imprisonment) शिक्षा सुनावली आहे. या महिलेनं आपल्या मित्राला तिच्या 16 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यास वारंवार प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. याशिवाय, न्यायालयाने दोषींना लाखो रुपयांचा दंडही ठोठावला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मूळची कायनाडूमधली असलेली मुवट्टुपुझा (Muvattupuzha) येथील एक महिला आणि तिचा 36 वर्षांचा मित्र अरुण कुमार (Arun Kumar) या दोघांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. न्यायालयाने या महिलेला 10 वर्षांचा सश्रम कारावास तर अरुण कुमारला 20 वर्षं कारावास आणि 2 लाख रुपये दंड भरण्याचा आदेश सुनावला आहे. या महिलेला कोणत्याही प्रकारची दया दाखवण्यात येऊ नये असं नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. वृत्तानुसार, मार्च 2017 ते ऑगस्ट 2017 या कालावधीत संबंधित मुलीवर अनेकदा बलात्कार करण्यात आला. कुमार नियमितपणे तिच्याकडे जात असे. तो तिला इडुक्कीमधल्या पल्लीवासल येथे घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला. या कृत्यासाठी तिच्या आईने प्रवृत्त केल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले. हे वाचा-10 लाखांसाठी 17 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या,मृतदेह लपवण्यासाठी केला भयंकर प्रकार 'ती एका मुलीची आई आहे. खरंतर, तिने तिचं संरक्षण करायला हवं होतं. पण ती देखील छळवणूक करणाऱ्यांमध्ये सहभागी झाली', असं न्यायालयाने निकालात म्हटलं आहे. या दोघांनाही आयपीसी (IPC), पॉक्सो कायदा आणि बाल न्यायाच्या कलमांखाली गंभीर गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आले आहे. दोषींकडून मिळालेली रक्कम पीडितेला दिली जाणार आहे. जानेवारीत समोर आले होते असेच प्रकरण केरळमधल्या कोझिकोड येथील थेन्हींपलमजवळ, एका 18 वर्षाच्या तरुणीचा मृतदेह घरात आढळून आला होता. तिच्या नातेवाईकांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचं त्यावेळी स्पष्ट झालं होतं. 'ही तरुणी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. ज्या घरात ही घटना घडली तिथं ती कुटुंबासमवेत वर्षभरापासून भाड्याने राहत होती', असं पोलिसांनी सांगितली. ही तरुणी तिच्या जवळच्या नातेवाईकांकडून सतत लैंगिक छळाची (Sexual Harassment) बळी ठरली होती आणि दोन वर्षापूर्वी पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सहा आरोपींपैकी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयीन कार्यवाही सुरू आहे. हे वाचा-भोंदूबाबाचा आईसह तीन मुलींवर बलात्कार; पैसेही उकळले, नाशिकच्या घटनेने खळबळ पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'या तरुणीची आई तिच्या लहान भावाला शाळेत सोडण्यासाठी गेली असता, तिने गळफास लावून घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या तरुणीच्या आईने सांगितले की, मुलीने खोलीला आतून कुलूप लावले होते. वारंवार हाका मारूनही ती नाश्ता करण्यासाठी बाहेर आली नाही. मला संशय आल्याने मी खिडकीतून पाहिले असता, तिनं गळफास घेतल्याचं दिसलं.' पॉक्सोचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या तरुणीला मानसिक त्रास दिला जात होता. आरोपी नातेवाईक असल्याने तक्रार मागे घेण्यासाठी कुटुंबीयांवर दबाव आणला जात होता, असं कुटुंबातील सूत्रांनी सांगितलं.
First published:

Tags: Kerala, Rape, Rape accussed, Rape case

पुढील बातम्या