Home /News /maharashtra /

Gondia News: 10 लाखांच्या खंडणीसाठी 17 वर्षीय मुलाची हत्या, आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Gondia News: 10 लाखांच्या खंडणीसाठी 17 वर्षीय मुलाची हत्या, आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

10 लाखांच्या खंडणीसाठी 17 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, मृतदेह लपवण्यासाठी केला भयंकर प्रकार

10 लाखांच्या खंडणीसाठी 17 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, मृतदेह लपवण्यासाठी केला भयंकर प्रकार

एका 17 वर्षीय मुलाच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 10 लाखांच्या खंडणीसाठी या मुलाची हत्या झाली असून या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

    नेहाल भुरे, प्रतिनिधी गोंदिया, 24 फेब्रुवारी : पैशांसाठी एका 17 वर्षीय मुलाची गळा आवळून हत्या (murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्याच्या (Aamgaon Taluka Gondia) अंतर्गत येणाऱ्या बंगावात ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपीला पकडलं असून त्याच्याकडून खळबळजनक माहिती समोर आली आहे. (17 year old boy murdered for 10 lakh rupees ransom) गोंदियाच्या आमगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या बंगावातील 17 वर्षीय चेतन खोब्रागडे या मुलाची हत्या झाली. या प्रकरणात आरोपीला अटक झाली असून 10 लाखाच्या खंडणीसाठी गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपीने चेतनची शेत शिवारात गळा आवळून हत्या केली. त्यानंतर चेतनचा मृतदेह कोणाच्याही हाती लागू नये म्हणून तनसीच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला होता. चेतन हा काल दुपारी आमगाव शहराला लागून असलेल्या रिसामा गावातील आपल्या मोठ्या आईकडे जाण्यासाठी निघाला होता मात्र, संध्याकाळ झाली तरी पोहचला नसल्याने घराच्या लोकांनी शोधा-शोध केली. वाचा : पुण्यात गोळीबार! चोरट्यांनी कोयता-दगड भिरकावल्यावर पोलिसांनी चालवल्या गोळ्या त्यानंतर कुटुंबीयांकडून चेतनच्या मिसिंग झाल्याची तक्रार पोलिसामध्ये देण्यात आली. याच दरम्यान आरोपीने चेतनच्या कुटुंबीयांना फोनवर कॉल करीत पैशांची मागणी केली होती. याच नंबरच्या आधारे पोलिसांनी मध्यप्रदेशच्या नवेगाव खैरलांजी गावातील 24 वर्षीय दुर्गाप्रसाद हरिणखेडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी दुर्गाप्रसाद हरिणखेडे याला पोलिसांनी ताब्यात घेत विचारपूस केली. यावेळी आरोपीने आमगाव शहराला लागून असलेल्या शेत शिवारात चेतनचा मृतदेह लपवून ठेवला असल्याची कबुली दिली. तसेच पैशांसाठी आपण हे कृत्य केल्याचंही त्याने कबूल केलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदना करिता पाठिविले असून पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. वाचा : 'मला माफ करा..,' म्हणत आवळला गळा, बापलेकांच्या खून प्रकरणात धक्कादायक खुलासा प्रेमाला नकार दिला अन् माथेफिरूने तरुणीच्या डोक्यात हातोडीने हल्ला एकतर्फी प्रेमातून अकराव्या वर्गात शिकणाऱ्या प्रियसीची आरोपी प्रियकराने हातोड्याने वार करत निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना गोंदिया जिल्ह्याच्या रावणवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चिरामणटोला येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनश्री हरिणखेडे (वय 18) असं मृत तरुणीचे नाव आहे. तर दुर्गाप्रसाद गणेश रहांगडाले असं या नराधम आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी या माथेफिरू तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Crime, Maharashtra, Murder

    पुढील बातम्या