Home /News /nashik /

Nashik Crime News: भोंदूबाबाचा आईसह तीन मुलींवर बलात्कार, धमकी देऊन पैसेही उकळले

Nashik Crime News: भोंदूबाबाचा आईसह तीन मुलींवर बलात्कार, धमकी देऊन पैसेही उकळले

भोंदूबाबाचा आईसह तीन मुलींवर बलात्कार; धमकी देऊन पैसेही उकळले, नाशिकमधील घटनेने खळबळ

भोंदूबाबाचा आईसह तीन मुलींवर बलात्कार; धमकी देऊन पैसेही उकळले, नाशिकमधील घटनेने खळबळ

नाशिकमध्ये भोंदूबाबाने तीन मुलींसह त्यांच्या आईवर बलात्कार (rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Nashik Crime News)

    लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 24 फेब्रुवारी : नाशिक जिल्ह्यातून (Nashik district) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका भोंदूबाबाने (Bhondu Baba) भावाच्या मदतीने एका महिलेसह तिच्या तीन मुलींवर बलात्कार (Raped on 3 girls) केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी भोंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहेत. (Nashik Bhondu Baba raped on 3 girls including her mother) मुलीला जादूटोणा झाल्याचा सांगत सलग दोन वर्षांहून अधिक काळ भोंदूबाबा आणि त्याच्या भावाने आईसह तिच्या 3 मुलींवर बलात्कार केला. ही घटना येवला शहरात घडली असून या संदर्भात दोन जणांवर बलात्कार तसेच धमकी देऊन पैसे उकळण्या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी भोंदूबाबा आणि त्याच्या भावास ताब्यात घेतले असून रात्री उशिरा दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वाचा : 24 तासांपासून बेपत्ता होतं प्रेमी जोडपं;खोलीत एकमेकांच्या मिठीत आढळले मृतावस्थेत चाकूचा धाक दाखवत बलात्कार मुलीचं लग्न जमत नसल्याने तालुक्यातील एका गावातील बाबाकडे गेली असता बाबाने मुलीला जादूटोणा झाला आहे असं सांगितलं. त्यावर उपाय करण्यासाठी भोंदूबाबाने आईसह तिन्ही मुलींना पिण्याच्या पाणी दिले आणि त्यानंतर चाकूचा धाक दाखवत फिर्यादी मुलीवर बलात्कार केला. इतकेच नाही तर बलात्कार करतानाचा व्हिडीओ शूट केला. ब्लॅकमेल करुन पीडित मुलीच्या आईवर बलात्कार या व्हिडीओच्या सहाय्याने भोंदूबाबाने तिच्या आईला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मग या भोंदूबाबाने पीडित मुलीच्या आईसह इतर दोन मुलींवर बलात्कार केला. वाचा : 10 लाखांसाठी 17 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या,मृतदेह लपवण्यासाठी केला भयंकर प्रकार बलात्कार करुन पैसेही उकळले भोंदूबाबा नाव सुफी अजीज अब्दुल बाबा आणि जब्बार शेख या दोघांनी तब्बल दोन वर्षे 4 महिने वेळोवेळी आई आणि तिच्या तिन्ही मुलींवर बलात्कार करून ब्लॅकमेल करत पैशाची मागणी देखील केली. तसेच एका मुलीस हिंदू धर्माबद्दल द्वेष निर्माण करून मुस्लिम बनण्यास प्रवृत्त केले. या प्रकरणी येवला शहर पोलीस अधिक तपास करीत आहे. वाचा : पुण्यात गोळीबार! चोरट्यांनी कोयता-दगड भिरकावल्यावर पोलिसांनी चालवल्या गोळ्या नाशिकमधील बापलेकांच्या खून प्रकरणात धक्कादायक खुलासा काही दिवसांपूर्वी नाशिकमधील पंडित कॉलनी परिसरातील गोपाळ पार्कमधील रहिवाशी मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा मुलगा डॉ. अमित कापडणीस यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपीची चौकशी सुरू असताना बापलेकाच्या खून प्रकरणी धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहूल याने 18 डिसेंबर रोजी मृत नानासाहेब कापडणीस यांना चर्चा करण्याच्या बहाण्याने आपल्या कारमध्ये बसवलं होतं. कारमध्ये चर्चा सुरू असताना दोघांमध्ये वाद झाला होता. आरोपीनं 'मला माफ करा...,' असं म्हणत माफी मागितली. पण वाद मिटला नाही. दोघांमध्ये वाद वाढतच गेला. यावेळी आरोपीनं मला माफ करा म्हणत नानासाहेब यांचा गळा आवळला.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Crime, Nashik, Rape

    पुढील बातम्या