मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Kanpur Crime News : बर्थडे डेला जाणाऱ्यावरून बिनसलं आणि पती-पत्नीनं थेट उचललं टोकाचं पाऊल

Kanpur Crime News : बर्थडे डेला जाणाऱ्यावरून बिनसलं आणि पती-पत्नीनं थेट उचललं टोकाचं पाऊल

उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्ह्यात किरकोळ वादातून एका जोडप्याने चालत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्ह्यात किरकोळ वादातून एका जोडप्याने चालत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्ह्यात किरकोळ वादातून एका जोडप्याने चालत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India

कानपूर, 27 जानेवारी : उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्ह्यात किरकोळ वादातून एका जोडप्याने चालत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अचानक उडी मारल्याने काहीकाळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. राज किशोर आणि त्याची पत्नी अंजना हे एका खाजगी कंपनीत काम करत होते. ते रोज चौबेपूर पोलीस सर्कल अंतर्गत येणाऱ्या मानधना स्टेशनवरून रेल्वेने एकत्र प्रवास करायचे.

अंजना मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी गेली होती आणि संध्याकाळी उशिरा रेल्वे स्टेशनवर पोहोचली. यामुळे राज किशोर संतापला पत्नीला स्टेशनवरच कानाखाली लगावली.

हे ही वाचा : चार दिवसांत आणखी एका चिमुकलीचा गेला बळी, बेपत्ता झाल्यानंतर घडलं भयानक

दरम्यान या किरकोळ कारणावरून त्यांच्यात जोरदार भांडण झाले. या दरम्यान समोरून रेल्वे येत होती. ही रेल्वे जवळ येताच दोघेही रेल्वे रुळावर पडले. दोघांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत दोघेही घरी न परतल्याने तीन मुली व एका मुलाने त्याचा शोध घेण्यास सुरू केले. यादरम्यान त्यांना घटनेची माहिती मिळाली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

दरम्यान ही घटना उत्तर प्रदेशमधील कानपूरमधील आहे. हे दाम्पत्य एका खाजगी कंपनीत काम करते. दरम्यान या दोघांचा रोज ट्रेनने प्रवास असतो परंतु अचानक एक दिवस असा आला की दोघांनी ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. राज किशोर आणि त्याची पत्नी अंजना यांच्यात त्या दिवशी किरकोळ कारणावरून भांडण झाले यावरून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

अंजना मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी गेली होती आणि संध्याकाळी उशिरा रेल्वे स्टेशनवर पोहोचली. त्यामुळे संतापलेल्या राज किशोरने अंजनाला रेल्वे स्टेशनवरच कानाखाली लावली. यानंतर दोघांमध्ये हाणामारी सुरू जोरदार वाद झाला. 

हे ही वाचा : पिंपरी चिंचवड : 16 वर्षीय मुलाला 12 व्या मजल्यावरुन खाली फेकलं, बापाचंही टोकाचं पाऊल

प्रकरण इथपर्यंत पोहोचले की समोरून ट्रेन येताच दोघांनीही उडी मारून आत्महत्या केली. आई आणि वडील घरी न परतल्याने त्यांची मुले त्यांना शोधण्यासाठी घराबाहेर पडल्याने हे प्रकरण समोर आले आहे. दरम्यान मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Kanpur, Uttar pradesh, Uttar pradesh news