मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पिंपरी चिंचवड : 16 वर्षीय मुलाला 12 व्या मजल्यावरुन खाली फेकलं, बापाचंही टोकाचं पाऊल

पिंपरी चिंचवड : 16 वर्षीय मुलाला 12 व्या मजल्यावरुन खाली फेकलं, बापाचंही टोकाचं पाऊल

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पिंपरी चिंचवड, 27 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तसेच आत्महत्येच्याही घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 16 वर्षीय मुलासह 12 व्या मजल्यावरून उडी मरून वडीलाने आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण बातमी -

पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरातील पलाश सोसायटीतील ही घटना आहे. 16 वर्षांच्या आपल्या पोटच्या मुलाला खाली फेकल्यानंतर वडिलाने उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दोघेही मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस अधिक तपास करत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - काय होणार पर्यावरणाचं? कोकणातील जगबुडी नदीत प्रदूषणानं 2 मगरींचा अंत

पुण्यात बोगस इंटरनॅशनल स्कूल - 

पुण्यात बोगस शाळा आढळल्याने मोठी खळबळ माजली होती. दरम्यान पुण्यात पुन्हा एकदा बोगस शाळेचा कारनामा पुढे आला आहे. शाळेच्या जागेची मान्यता प्रमाणपत्रच बोगस निघाल्याने जोरदार चर्चा रंगली आहे. पुण्यातील बोगस शाळांविषय दररोज धक्कादायक माहिती समोर येत असल्याने पुण्यात अजूनही बोगस शाळा बाहेर येण्याची शक्यता आहे. दरम्यान विभागीय आयुक्त सौरभ राव यांची जिल्हाधिकारी म्हणून स्वाक्षरी असल्याने राव अडचणीत येण्याची शक्यता आहे.

एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल हवेली तालुक्यातील चिखली येथील शाळेच्या प्रमाणपत्रावर विभागीय आयुक्त सौरभ राव यांची स्वाक्षरी आढळली आहे. सीबीएससीचे बनावट प्रमाणपत्र बनविण्यासाठी तयार करण्यात आलं असल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. दरम्यान तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सही केल्याची माहिती उघड झाली आहे.

First published:

Tags: Deaths, Police, Pune, Pune crime news