रवी शिंदे, प्रतिनिधी
भिवंडी, 25 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भिवंडीत तीन वर्षाच्या चिमुकलीची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
भिवंडीत तीन वर्षाच्या चिमुकलीची हत्या करण्यात आली आहे. भिवंडी शहरातील नागाव परिसरातील या धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. काल दुपारपासून ही तीन वर्षांची चिमुकली बेपत्ता झाली होती. मात्र, आज थेट तिचा मृतदेहच सापडला. तिच्यावर अत्याचार झाल्याच्या संशयावरून मृतदेह हा मुंबईतील जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
चार दिवसात दुसरी हत्या -
रविवारी देखील काटई गावात तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. एका विकृत नराधमाने तीन वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली होती. निजामपुरा पोलिसांनी पाच तासात या आरोपीला अटक केली आहे. यानंतर आता पुन्हा एका तीन वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात आली आहे. मागील चार दिवसात दोन चिमुकलींच्या हत्या केल्याच्या घटनांनी भिवंडी हादरली आहे.
जादूटोण्याचा संशय अन् चुलत भावांनीच भावासह 7 जणांना संपवलं -
अवघ्या महाराष्ट्राला हादरावून सोडणाऱ्या पुणे जिल्ह्यातील दौंडमधील एकाच कुटुंबातील 7 जणांच्या मृत्यू प्रकरणाचा अखेर छडा लागला आहे. आपल्या मुलाच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा संशय घेऊन चुलत भावांनी आपल्याच भावाचे कुटुंब संपवल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे.
हेही वाचा - पाचशे रुपयांसाठी टुरिस्ट व्यावसायिकाचा खून; घटनेने पुणे हादरलं!
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज गावात राहणाऱ्या पवार आणि फुलावरे कुटुंबातील महिला आणि पुरुषांचे टप्प्याटप्प्याने सहा दिवसात 7 मृतदेह दौंड तालुक्यातील पारगाव मधील भीमा नदी पात्रात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. नेमका यांचा घातपात झाला की, आत्महत्या केली याबद्दल पोलिसांकडून तपास सुरू होता. अखेरीस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhiwandi, Crime news, Murder, Small child, Thane