जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / 6 महिन्यांपूर्वीही झालेला अंजलीचा भीषण अपघात, जीवे मारण्याचा होता कट? कंझावाला प्रकरणात मोठी अपडेट

6 महिन्यांपूर्वीही झालेला अंजलीचा भीषण अपघात, जीवे मारण्याचा होता कट? कंझावाला प्रकरणात मोठी अपडेट

फाईल फोटो

फाईल फोटो

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातातही अंजली गंभीर जखमी झाली होती. गेल्या वर्षी 16 जुलै रोजी पीरागढी भागात ही घटना घडली होती. याचं एक फुटेजही मिळालं आहे, ज्यामध्ये अंजलीच्या स्कूटीला अपघात होताना दिसत आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली 08 जानेवारी : दिल्लीतील सुलतानपुरी पोलीस अंजली प्रकरणाच्या तपासात अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. आता आणखी एक अपडेट समोर आली आहे. यानुसार, सहा महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातातही अंजली गंभीर जखमी झाली होती. गेल्या वर्षी 16 जुलै रोजी पीरागढी भागात ही घटना घडली होती. याचं एक फुटेजही मिळालं आहे, ज्यामध्ये अंजलीच्या स्कूटीला अपघात होताना दिसत आहे. या फुटेजमध्ये भरधाव वेगाने येणारी एक स्कूटी रस्त्याच्या कडेला पडलेल्या टायरला धडकते आणि हवेत उडून खाली पडते. पोलिसांनी जखमीचं मेडिकल केलं होतं, ज्यात अंजलीच्या रक्तात दारूचं प्रमाणही आढळून आलं. मात्र, प्रत्यक्षात सहा महिन्यांपूर्वी रस्ता अपघात झाल्याचं भासवून अंजलीला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं तिच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. या अपघातात अंजलीला सुमारे 15 दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिल्लीसारखी आणखी एक घटना; कारने 15 वर्षीय विद्यार्थ्याला 1 KM फरफटत नेलं, पाहा Shocking Video अंजलीच्या घटनेमुळे दिल्ली पोलिसांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतानाच पोलिसांनी काही नवीन आदेश जारी केले आहेत. रोहिणी जिल्ह्यातील एसएचओ, एटीओ आणि ब्रेवो या तीनही निरीक्षकांसाठी नवीन सूचना जारी करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटलं आहे की, तिन्ही निरीक्षक रात्री त्यांच्या परिसरात गस्त घालतील. मध्यरात्री 12 ते पहाटे 4 दरम्यान लाईव्ह लोकेशनही शेअर करतील. याशिवाय डीसीपींच्या परवानगीशिवाय ते पोलीस स्टेशन सोडणार नाहीत. प्रत्यक्षात अंजलीच्या घटनेतील सर्व पीसीआर कॉल्स रोहिणी परिसरात आले होते. मात्र यामध्ये रोहिणी जिल्ह्यातील पीसीआर व्हॅनला मृतदेह फरफटत नेणारी कार सापडली नाही, त्यामुळे हा आदेश जारी करण्यात आला आहे. अंजलीला फरफटत नेणाऱ्या कारचा मालक पोलिसांना सापडला; आरोपींना अशी केली होती मदत कंझावाला प्रकरणातील एकमेव साक्षीदार निधीबाबत सातत्याने नवनवीन खुलासे होत आहेत. कांजवाला प्रकरणातील साक्षीदार निधी ही ड्रग्ज पेडलर आहे. 6 डिसेंबर 2020 रोजी, निधीला पोलिसांनी दोन मित्रांसह आग्रा कॅंट रेल्वे स्थानकावर पकडलं होतं. तिघांकडे दहा किलो गांजा सापडला. नंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. सुमारे दीड महिना आग्रा तुरुंगात राहिल्यानंतर ती जामिनावर बाहेर आली. शनिवारीही निधीच्या केसची तारीख होती, पण ती न गेल्याने तिच्या वकिलाने अर्ज करून पुढची तारीख घेतली. 6 डिसेंबर 2020 रोजी, आग्रा कॅंट स्टेशनच्या फूटओव्हर ब्रीजजवळ दोन तरुण आणि एका मुलीला सरकारी रेल्वे पोलिसांनी चेकिंग करताना पकडले. मुलीने आपले नाव निधी आणि पत्ता सुलतानपुरी असल्याचे सांगितले होते. या तरुणांनी आपली नावे सामी उर्फ ​​माही आणि रवी कुमार सांगितली होती. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी ३१ जानेवारी रोजी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. त्यांनी तेलंगणातून गांजा आणला असल्याचं निधीनं सांगितलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात