त्र्यंबकेश्वर, 07 ऑक्टोबर : चेष्टा मस्करीत गुदद्वारात हवा भरल्याने अत्यावस्थ झालेल्या 29 वर्षीय रोजदारीवर असलेल्या कामगाराचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये घडली आहे. धक्कादायक म्हणजे, 9 दिवसांनतर ही घटना उघडकीस आली आहे. ठानापाडा तालुका त्र्यंबकेश्वर लगतच्या तळवाडे शिवारात अशोका इस्टेट डेव्हलपर प्रा.लिमिटेड कंपनीचा कृषी उद्योग सुमारे दीडशे एकरावर विस्तारला गेला आहे. या ठिकाणी विविध फळझाडे व त्या फळांपासून पेय व खाद्य पाकिटे बनविली जातात. येथील काजू डाळींब,आंबे अशा प्रकारातील फळांपासून वेफर्स, चिवडा, जाम अशी उत्पादने तयार करून विक्री केली जातात. 20 लाखांचे 28 लाख सुट्टे देतो म्हणून बोलावले,लाँड्रीचालकासोबत घडले भयंकर… येथील शेतात कामासाठी कंत्राटी पद्धतीने कामगार कामास येतात. साधारण: 250 रूपये रोज अशी मजुरी दिली जाते. देव डोंगरी पाड्यावरील सात आठ जणांचा ग्रुप येथे सव्वा महिन्यापासून रोजदारीवर कामास आला होता. या सर्व अकुशल कामगार यांना शेतात फांद्या वेचणे व काजूगर निवडणे, साफ करणे या शेतीविषयक कामे दिली होती. 28 सप्टेंबरला दुपारी दोनच्या सुमारास अंबादास तुटे (वय 29) याच्या बरोबरच्या इतर कामगारांनी चेष्टा मस्करी करीत कॉम्प्रेसरने गुदद्वारात हवा भरली. चेष्टा मस्करीत झालेल्या या प्रकारानंतर या तरुणाला काही वेळानंतर त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याच्या इतर मजूर साथीदारांनी अंबादासला त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक तपासणी केल्यानंतर अंबादासला पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालय खासगी वाहनाने हलवण्यात आले असा सायंकाळी पाच वाजता अंबादासचा मृत्यू झाला. ग्रामपंचायत सेवकाची डोक्यात गोळी झाडून हत्या, सख्ख्या भावाला शार्प शूटरसह अटक दरम्यान, मृत झालेला कामगार हा कंपनीत त्याची आई व भावासह दुपारपासून होता. व्यवस्थापक हिरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाला या घटनेची माहिती दिली. मृताची बहीण तिथेच कामाला होती. याबाबत मृताचा भाऊ सुभाष तुटे याने अखेर पोलिसांत घटनेची माहिती दिली. मात्र, घटना घडून नऊ दिवस झाले तरी कुठेही वाच्यता व तपास झाला नसल्याची चर्चा कामगार वर्गात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.