मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

20 लाखांचे 28 लाख सुट्टे देतो म्हणून बोलावले, लाँड्रीचालकासोबत पुढच्या क्षणाला घडले भयंकर...

20 लाखांचे 28 लाख सुट्टे देतो म्हणून बोलावले, लाँड्रीचालकासोबत पुढच्या क्षणाला घडले भयंकर...

कर्जाची परत फेड करायची म्हणून मुख्य आरोपी भरत याच्या माध्यमातून 25 लाख रुपये कर्ज हे घर गहाण ठेवून घेतले होते, पण...

कर्जाची परत फेड करायची म्हणून मुख्य आरोपी भरत याच्या माध्यमातून 25 लाख रुपये कर्ज हे घर गहाण ठेवून घेतले होते, पण...

कर्जाची परत फेड करायची म्हणून मुख्य आरोपी भरत याच्या माध्यमातून 25 लाख रुपये कर्ज हे घर गहाण ठेवून घेतले होते, पण...

 

भिवंडी,07 ऑक्टोबर : '20 लाख रुपयांचे बंदे दिले तर त्या बदल्यात 28 लाख सुट्टे देणारे माणसे माझ्याकडे आहेत' असं एका लॉंड्री चालकाला आमिष दाखवून लोन एजंटने साथीदारांच्या मदतीने 20 लाख रुपये लुटून पोबारा केल्याची घटना समोर आली आहे.

महेश खेमजी साकला (वय 52, रा.कांदिवली ,मुंबई ) असं फसवणूक झालेल्या लॉंड्री चालकाचे नाव आहे. तर भरत मोहनलाल गोहिल (वय 52, रा.रामनगर ,कांदिवली पूर्व ,मुंबई) असे लोन एजंट असलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. तर त्याच्यासह इतर 9 भामट्यांचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे. विशेष म्हणजे, मुख्य आरोपीनेच फसवणूक झालेल्या महेश साकला यांचे घर गहाण ठेवून त्यांना चाला मंडलम फायनान्स कंपनीमधून 25 लाख कर्ज मंजूर करून ते उपलब्ध करून दिले होते.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी मित्राकडून 13 लाख रुपये कर्ज घेतले होते. या कर्जाची परत फेड करायची म्हणून मुख्य आरोपी भरत याच्या माध्यमातून 25 लाख रुपये कर्ज घर गहाण ठेवून घेतले. याचाच फायदा घेऊन मुख्य आरोपी भरत याने लॉंड्रीचालक महेश यांना 20 लाख रुपये बंदे दिले तर काही माणसे त्या बदल्यात 28 लाख रुपये देतील. त्यामुळे 8 लाख फायदा होईल, असं आमिष दाखवले. याला बळी पडून ठरल्याप्रमाणे लॉंड्री चालक आणि त्याचा मुलगा 20 लाखांची रोख रक्कम बॅगेत भरून सोमवारी सायंकाळच्या सुमाराला मुंबई - नाशिक महामार्गावरील मिनी पंजाब हॉटेल समोर असलेल्या गोदामाच्या गेटवर आले.

त्या ठिकाणी आदीपासूनच मुख्य आरोपी भरत हा घटनास्थळी होता. तसंच त्याचे आणखी 5 साथीदार कारमध्ये येऊन थांबले. त्यांनतर 20 लाख रुपयांची रक्कम आरोपी भरत याने कारमध्ये बसलेल्या अनोखळी व्यक्तीस देण्यास सांगितले असता अचानक मारहाणीचे नाटक करून भरत याने 8 साथीदारांसह 20 लाखांची रोकड घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला.

या प्रकरणी लॉंड्री चालकाने लोन एजंटसह त्याच्या 9 अनोखळी साथीदारांवर फसवणूक केल्याची तक्रार नारपोली पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास नारपोली पोलीस ठाण्याचे एपीआय.एल.बी.चव्हाण करीत आहेत.

First published:

Tags: Bhiwandi, भिवंडी