Home /News /crime /

ग्रामपंचायत सेवकाची डोक्यात गोळी झाडून हत्या, सख्ख्या भावाला शार्प शूटरसह अटक

ग्रामपंचायत सेवकाची डोक्यात गोळी झाडून हत्या, सख्ख्या भावाला शार्प शूटरसह अटक

या प्रकरणी पहाटे चार वाजता गावठी कट्ट्यासह दोन संशयितांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. तर एक संशयित फरार आहे.

नाशिक, 07 ऑक्टोबर : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथील ग्रामपंचायत सेवक देविदास कुटे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.   सख्या भावानेच शार्प शूटरच्या मदती आपल्या भावाच्या हत्येची कबुली दिली आहे. वडझिरे इथं रात्री 11:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. देविदास कुटे यांच्यावर हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. कुटे यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यात एक गोळी कुटे यांच्या डोक्यावर लागली होती. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. 20 लाखांचे 28 लाख सुट्टे देतो म्हणून बोलावले,लाँड्रीचालकासोबत घडले भयंकर... देविदास कुटे यांच्यावर गोळीबाराची घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. देविदास कुटे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवले.  शहरात नाकाबंदी करून हल्लेखोरांना शोध घेण्यात आला असता अवघ्या काही तासांत संशयित हल्लेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले. पालघर प्रकरणी काय कारवाई केली?राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात दिली माहिती या प्रकरणी पहाटे चार वाजता गावठी कट्ट्यासह दोन संशयितांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. तर एक संशयित फरार आहे. देविदास कुटे यांच्या भावालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी भावाची चौकशी केली असता देविदास कुटे यांच्या डोक्याच्या मध्यभागी गोळी झाडून हत्या केल्याची कबुली भावाने दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी जबाब नोंदवला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. देविदास कुटे यांच्या हत्येमुळे गावात तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Crime, Nashik

पुढील बातम्या