मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पोलीस कर्मचाऱ्याने रेल्वेसमोर उडी मारून संपवलं जीवन, आव्हाडांचे होते काही काळ अंगरक्षक!

पोलीस कर्मचाऱ्याने रेल्वेसमोर उडी मारून संपवलं जीवन, आव्हाडांचे होते काही काळ अंगरक्षक!

अनंत करमुसे प्रकरणी वैभव कदम यांची सतत चौकशी सुरू होती. त्यानंतर अचानक आज आत्महत्या केल्याची बातमी समोर आली

अनंत करमुसे प्रकरणी वैभव कदम यांची सतत चौकशी सुरू होती. त्यानंतर अचानक आज आत्महत्या केल्याची बातमी समोर आली

अनंत करमुसे प्रकरणी वैभव कदम यांची सतत चौकशी सुरू होती. त्यानंतर अचानक आज आत्महत्या केल्याची बातमी समोर आली

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Thane, India

ठाणे, 29 मार्च : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे अंगरक्षक राहिलेले  पोलीस कर्मचाऱ्याने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. अनंत करमुसे प्रकरणी वैभव कदम यांची सतत चौकशी सुरू होती. त्यानंतर अचानक वैभव कदम यांनी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघा-ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. वैभव कदम असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. आज सकाळी वैभव कदम यांनी रेल्वेसमोर उडी मारून जीवन यात्रा संपवली.

वैभव कदम हे काही काळ जितेंद्र आव्हाड यांचे अंगरक्षक होते. अनंत करमुसे प्रकरणात वैभव यांची सतत चौकशी सुरू होती. आज अचानक वैभव यांनी आत्महत्या केली. वैभव यांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट नाही.

(लग्नदिवशीच वऱ्हाडावर काळाचा घाला, भीषण अपघातात 3 ठार तर 12 गंभीर)

आज सकाळी निळजे - तळोजा रेल्वे ट्रॅक दरम्यान वैभव कदम जखमी अवस्थेत आढळले होते त्यांना दिवा हॅास्पिटल येथे नेले असता मृत घोषित केले त्यांचा मृतदेह पोस्टमार्टम करता ठाणे सिव्हिल हॅास्पिटल येथे आणण्यात आला, अशी माहिती ठाणे रेल्वे पोलिसाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिली. वैभव कदम यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी ठाणे सिव्हिल हॅास्पिटलला आणण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

काय आहे प्रकरण?

ठाण्यात घडलेले इंजिनिअर अनंत करमुसे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. कारण या प्रकरणात आरोपी असलेल्या पोलीस जवान वैभव कदम नावाच्या पोलीस जवानाने आत्महत्या केली आहे. निळजे ते तळोजा दरम्यान स्वत:ला मेमो लोकलसमोर झोकून देत वैभवने बुधवारी सकाळी ९:०५ वाजता आत्महत्या केली. वैभव यांची अनेक दिवसांपासून अनंत करमुसे मारहाण प्रकरणी सतत चौकशी सुरू होती. याकरता ठाण्यात वैभवला यावे लागायचे. या प्रकरणावरून राजकारण सुरू झाले असून भाजपाचे पदाधिकारी मोहित कंबोज यांनी ट्विट केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

(मला IPS व्हायचं होतं, ताईला घेऊन जा मी चालले, 13 वर्षांच्या मुलीने संपवलं आयुष्य, बीड हळहळलं)

वैभव कदम यांनी आत्महत्या केली त्यांनी त्यासाठी कोणाला जबाबदार धरू नये असं त्यांनी व्हॉटसअप स्टेससवर लिहिलंय पण अनंत करमुसे प्रकरणात त्यांच्यावर आरोप असल्याने आता जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होत आहे. की तपास यंत्रणांना याचा फटका बसतोय हे लवकरच स्पष्ट होईल.

First published:
top videos

    Tags: Thane