मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडून लहान मुलाचा मृत्यू; गृह प्रवेशाच्या दिवशीच घडली दुर्घटना

इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडून लहान मुलाचा मृत्यू; गृह प्रवेशाच्या दिवशीच घडली दुर्घटना

इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडल्याने 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू (Death) झाला आहे. दुर्दैव म्हणजे त्या कुटुंबीयांनी त्याच दिवशी नव्या घरात गृहप्रवेश केला होता. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांसह कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे.

पुढे वाचा ...

रांची, 18 नोव्हेंबर : एखाद्या नव्या ठिकाणी गेल्यावर त्या परिसराची पूर्ण माहिती नसेल, तर अशा ठिकाणी मुलांना एकटं सोडणं धोकादायक ठरू शकतं. अनेकदा पालक मुलांना घराच्या परिसरात खेळायला पाठवतात. अशावेळी मुलांकडे लक्ष देणं गरजेचं असतं. अन्यथा नकळत अपघात (Accident) होण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या असून, अशा घटनांमध्ये मुलांना आपला जीवदेखील गमवावा लागला आहे. झारखंडमध्ये (Jharkhand) घडलेली ही दुर्घटना त्यापैकीच एक. झारखंडमधील चिराचास येथील एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडल्याने 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू (Death) झाला आहे. दुर्दैव म्हणजे त्या कुटुंबीयांनी त्याच दिवशी नव्या घरात गृहप्रवेश केला होता. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांसह कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे.

गृहप्रवेशाच्या दिवशीच दुर्घटना

चिराचास येथील एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडल्याने 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू (Death) झाला आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी या मुलाला तातडीनं रुग्णालयात (Hospital) दाखल केलं; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलाचं कुटुंब चासमधल्या आनंद विहार फेज वन या इमारतीत राहण्यासाठी आले होते. त्यांनी कालच (17 नोव्हेंबर) गृहप्रवेश केला होता.

हेही वाचा : काय बोलतो भिडू? अवघ्या दहा वर्षाचा मुलगा जगण्याचा मार्ग सांगतो, VIDEO व्हायरल

या घटनेनंतर परिसरात शोकाकूळ वातावरण आहे. मुलाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. इमारतीच्या टॉप फ्लोअरवर (Top Floor) रेलिंगची उंची कमी असल्यानं हा अपघात (Accident) झाल्याची चर्चा आहे. मृत मुलाला दृष्टी दोष (Visual Impairment) होता आणि तो जास्त नंबरचा चष्मा वापरत होता. बुधवारी चष्मा न लावता हा मुलगा टेरेसवर गेला होता.

नेमकं काय घडलं?

धीरज झा हे बुधवारी चिरा चास येथील आनंद विहार फेज वन इमारतीत गृहप्रवेश करुन राहण्यासाठी आले. त्यांचा इयत्ता पाचवीमध्ये असलेला 11 वर्षांचा मुलगा अय्यप्पा इमारतीच्या टॉप फ्लोअरवर चष्मा न घालता गेला. मात्र रेलिंगची उंची कमी असल्याने तो गच्चीवरून खाली पडला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली. त्या मुलाला तातडीने बोकारोतल्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं तेथील डॉक्टर्सनी घोषित केलं.

हेही वाचा : भीक मागून गुजराण करणाऱ्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला हजारोंची गर्दी; कारण काय?

या घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, स्थानिक नागरिकांमध्ये शोकाकूल वातावरण आहे. या घटनेविषयी स्थानिक नागरिक भाष्य करणं टाळत असल्याचं दिसून आलं आहे. त्यातच कुटुंबीयांना या घटनेमुळे मानसिक धक्का बसल्यानं तेदेखील यावर भाष्य करू शकत नसल्याची स्थिती आहे.

First published:

Tags: Accident, Death, Jharkhand