जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पाच हजारांसाठी हत्या, कन्नड घाटात घातपात, अखेर खुन्यांच्या कुकृत्यांचा सर्वनाश

पाच हजारांसाठी हत्या, कन्नड घाटात घातपात, अखेर खुन्यांच्या कुकृत्यांचा सर्वनाश

पोलिसांनी आरोपींना अटक केली

पोलिसांनी आरोपींना अटक केली

पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आणि धक्कादायक माहिती उघड झाली. अवघ्या पाच हजार रुपयांसाठी संबंधित व्यक्तीची हत्या झाल्याची माहिती उघड झाली.

  • -MIN READ Jalgaon,Maharashtra
  • Last Updated :

नितीन नांदुरकर, जळगाव, 1 ऑक्टोबर : काही दिवसांपूर्वी कन्नड घाटात एक मृतदेह आढळला होता. या मृदेहाची ओळख पटली नव्हती. पोलिसांकडून मृतक व्यक्तीच्या कुटुंबियांचा शोध सुरु होता. मृतदेहाची अवस्था पाहता पोलिसांना संबंधित व्यक्तीसोबत घातपात झाल्याचा संशय होता. विशेष म्हणजे मृतक व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना प्रचंड संघर्ष करावा लागला. त्यानंतर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आणि धक्कादायक माहिती उघड झाली. अवघ्या पाच हजार रुपयांसाठी संबंधित व्यक्तीची हत्या झाल्याची माहिती उघड झाली. संबंधित मृतक व्यक्तीच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार केली होती. मधुकर रामदास बुटाले बेपत्ता असल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली होती. बुटाले यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना यावेळी त्यांचं वर्णन करुन सांगितलं होतं. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. या दरम्यान चाळीसगाव-कन्नड रस्त्यावर कन्नड घाटात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. संबंधित व्यक्ती नेमकी कोण आहे? याचा पत्ता लागत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींची तक्रार करणाऱ्या तक्रारदारांना बोलावलं. यावेळी तक्रारदारांनी मधुकर बुटाले यांच्या मृतदेहाला ओळखले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. ( लग्न, धमकी, राग अन् संसाराचा The End; 48 तासात चक्र फिरलं, अन् कविताचा गेला जीव ) मृतदेहाची ओळख पटल्यानंतर ग्रामीण पोलिसांच्या तपासाला पुन्हा वेग आला. पोलिसांनी या प्रकरणाचा आणखी खोलवर तपास करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपणच मधुकर बुटाले यांचा खून केल्याचं कबूल केलं. गोपाल शंकर पंडित आणि कृष्णा रामदास भोसले अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी मधुकर यांची हत्या का केली? याबद्दल सविस्तर कबुली जबाब दिला. मृत मधुकर रामदास बुटाले यांना 27 ऑगस्टला औरंगाबाद येथील रामगिरी हॉटेल येथून एका रिक्षातून गावी घेऊन जात होते. या दरम्यान रस्त्यात त्यांच्यात पाच हजार रुपयांवरुन वाद सुरु झाला. हा वाद इतका वाढला की त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. त्यानंतर आरोपींनी मधुकर यांचा गळा दाबून खून केला. नंतर कन्नड घाटात मृतदेह फेकून दिला, असा कबुली जबाब आरोपींनी दिला. ग्रामीण पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात