अमित राय/ जळगाव, 1 ऑक्टोबर : जळगाव शहरातील आहुजा नगर परिसरातील शिवधाम मंदिरासमोरील ब्रम्हांडनायक अपार्टमेंटमध्ये पतीने पत्नीचा मोबाईल चॉर्जरच्या वायरने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे. कविता जितेंद्र पाटील वय २० असे मयत विवाहितेचे नाव आहे. तर जितेंद्र संजय पाटील वय २५ असे संशयित पतीचे नाव आहे. जितेंद्र हा पत्नीला गळफास दिल्यानंतर स्वतःच तालुका पोलीस ठाण्यात हजर झाल्याची ही माहिती मिळाली आहे. नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, आहुजा नगर परिसरात ब्रह्मांडनायक अपार्टमेंट असून अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये जितेंद्र संजय पाटील हा पत्नी कविता व दीड वर्षाची मुलगी या कुटुंबासह वास्तव्यास आहे. जितेंद्र हा मिळेल ते काम करुन तो उदरनिर्वाह भागवितो. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता पती जितेंद्र याचा पत्नीसोबत वाद झाला. या वादातून जितेंद्र याने मोबाईलच्या चार्जरच्या वायरने पत्नी कविता हिचा गळा आवळून खून केला. पत्नीचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर पती जितेंद्र हा स्वतःच तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला. व त्यानेच पोलिसांना मी पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. त्यानुसार तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. तातडीने कविता हिचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. घटनेची माहिती मिळाल्यावर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनीही घटनास्थळी भेट माहिती जाणून घेतली. घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यामुळे या अपार्टमेंट जवळ एकच गर्दी झाल्याचे पाहायला मिळालं. पतीने नेमका कोणत्या कारणावरून त्याच्या पतीचा खून केला हे कळू शकलेलं नाही. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे. नवरा तिला ‘काळी’ म्हणून टोमणे मारायचा, अखेर संतापलेल्या बायकोनं पुसलं स्वत:चं कुंकु पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे गाव सोडले..तरी पण… सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जितेंद्र हा मूळ धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील रहिवासी आहे. त्याचं आणि कविताचं दोन ते तीन वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला आहे. एक ते दोनदा गावातील एका तरुणासोबत कविताला जितेंद्र याने रंगेहाथ पकडले होते. पत्नी कविताचे तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचे स्वत:च्या डोळयांनी पाहिल्यावर जितेंद्र याने कविताला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही कविता ऐकत नसल्याने जितेंद्र हा काही दिवसांपूर्वी जळगावात राहायला आला होता. याठिकाणी संबंधित तरुणसोबत जितेंद्र याने त्याची पत्नी कविता हिला रंगेहाथ पकडले होते. याबाबत कविताला समजविल्यावर कविता उलट जितेंद्र यास आत्महत्येची धमकी देत होती. नातेवाईकांना सांगितले तर मी आत्महत्या करुन की तुम्हा सर्वाचे नाव टाकून देईन अशी धमकी कविता देत होती. यामुळे जितेंद्र प्रचंड तणावात होता. सततच्या पत्नीच्या धमकीने संताप अनावर…पतीने अखेर तिचा जीवच घेतला.. दोन दिवसांपूर्वीच जितेंद्रने त्याच्याच घरी कविताला तरुणासोबत रंगेहाथ पकडले होते. त्यामुळे त्याचा संताप अनावर झाला होता. याचवरुन आज शनिवारी जितेंद्र कविताला समजावत होता. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला, वादात कविताने नेहमीप्रमाणे जितेंद्रला आत्महत्येची धमकी दिली. यामुळे संताप अनावर झाल्याने जितेंद्र याने मोबाईलच्या चार्जरच्या वायरने पत्नी कविता हिचा खून केला व खून केल्यानंतर पेालिसात हजर झाला. ही माहिती जितेंद्र याने दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.